नाशिक : करोना संसर्गामुळे राज्यातल्या शाळा शहर तसेच ग्रामीण भागात एकापाठोपाठ बंद करण्यात आल्या. सोमवारपासून बालवाडी ते बारावीचे वर्ग पुन्हा भरतील, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी दिली. मात्र त्याच वेळी शाळा सुरू करण्यासंदर्भात अधिकार स्थानिक प्रशासनाकडे दिल्याने शाळा सुरू करण्याचा चेंडू पुन्हा एकदा प्रशासनावर अवलंबून असल्याने शैक्षणिक वतुर्ळात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोनाचा वाढता संसर्ग पाहता साधारणत: दोन आठवडय़ांपूर्वी शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. नाशिक जिल्ह्यातही शाळा, महाविद्यालयांमध्ये करोनाबाधित विद्यार्थी आढळले. करोनाच्या नव्या विषाणूचा वाढता प्रभाव, जिल्ह्यातील वाढती करोना रुग्णांची संख्या पाहता या निर्णयाचे काहींनी समर्थन केले. मात्र प्रदीर्घ कालावधीनंतर सुरू झालेल्या शाळा पुन्हा बंद झाल्याने विद्यार्थी हिरमुसले. शहरात ऑनलाइन शिक्षणाचा डंका पिटला जात असताना ग्रामीण भागांत विद्यार्थ्यांना शेतीच्या कामात मदतीसाठी घेण्यात येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा शाळा सुरू करा अशी मागणी जोर धरू लागली. या कालावधीत दहावी तसेच बारावीचे वर्ग सुरू होते. शाळा स्तरावर १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करण्याचे काम सुरू आहे. गुरुवारी शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी शाळा सुरू करण्याबाबत सकारात्मकता दर्शवत सोमवारपासून शाळा सुरू होतील, असे संकेत देताना काही निकष लादले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मात्र शिक्षण विभागाची वेट अ‍ॅण्ड वॉचची भूमिका असल्याने शैक्षणिक वतुर्ळात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. याविषयी बोलताना महापालिका प्रशासनाधिकारी सुनीता धनगर यांनी सांगितले की, शाळा सुरू करण्याबाबत राज्यस्तरावरून अद्याप लेखी सूचना आलेल्या नाहीत. तसेच शाळा सुरू करायच्या की नाही याबाबत महापालिका आयुक्त तसेच जिल्हाधिकारी जो निर्णय घेतील त्याची अंमलबजावणी होईल. तर माध्यमिक शिक्षणाधिकारी मिच्छद्र कदम यांनी सांगितले, याबाबत लवकरच जिल्हाधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेण्यात येईल. ग्रामीण भागात पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात काही अडचण नाही. शाळा सुरू व्हाव्यात यासाठी आम्ही आग्रही असून सोमवारपासून पाचवी ते बारावीच्या ७०० हून अधिक शाळा पुन्हा भरतील असा विश्वास व्यक्त केला.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kindergarten to 12th class school starts from monday zws
First published on: 21-01-2022 at 01:20 IST