नाशिक जिमखान्याचा वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण सोहळा २२ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी दिपेंद्रसिंह कुशवाह यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
जिमखान्याच्या क्रीडा महोत्सवांतर्गत बिलियर्ड्स व स्नूकर, टेबल टेनिस, बॅडमिंटन, लॉन टेनिस, बुद्धिबळ या खेळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. वार्षिक क्रीडा महोत्सवाचा पारितोषिक वितरण समारंभ सोमवारी सायंकाळी ६.१५ वाजता होणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष व ज्येष्ठ क्रीडा संघटक नरेंद्र छाजेड, सचिव राधेश्याम मुंदडा यांनी दिली. जास्तीत जास्त खेळाडूंनी, क्रीडाप्रेमींनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष नितीन मोडक, कार्याध्यक्ष अनिल चुंबळे, खजिनदार नितीन चौधरी आदींनी केले आहे