वाशी विभाग कार्यालयाच्या अतिक्रमण विभागाने वाशीतील तीन ठिकाणी बुधवारी दुपारी धडक कारवाई केली आहे. यात वाशी गावाजवळील हायवे लगत असलेल्या चायनीज सॅण्डवीच व वडापाव विक्रेत्यांवर कारवाई करून पथकाने गाडया तसेच ३ सिलेंडर, ६ शेगडया व इतर साहित्य जप्त केले आहे. विनापरवाना सार्वजनिक ठिकाणी जाहिरात बाजी केल्याप्रकरणी संगणक क्लास व स्पा सेंटर अशा दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आल्या आहेत.
विक्रेत्यावर केलेल्या कारवाईप्रमाणेच पथकाने सेक्टर १७ येथील वाशी प्लाझामधील दिशा संगणक क्लास व मुझे स्पा सेंअरवर अनधिकृत जाहिरात प्रकरणी कारवाई केली.वाशी परिसरातील सार्वजनिक ठिकाणी दिशा संगणक क्लास व मुझे स्पा सेंटरने जाहिरातीचे स्टिकर चिटकविले होते. वाशी परिसरात विना परवानगी स्टिकर चिटकविल्या प्रकरणी वाशी विभाग कार्यालयातील अतिक्रमण विभागाकडून ही कारवाई करण्यात आली. विभाग कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक मेमाने यांच्या तक्रारीवरून वाशी पोलिसांनी दिशा संगणक व मुझे स्पा सेंटरवर गुन्हा दाखल केला आहे.