उन्हाचा तडाखा वाढू लागला असून तपमानात वाढ होत असतांना जंगल परिसरातील वण्यांची संख्या वाढू लागली आहे. जंगलातील वनसंपत्ती तसेच रस्त्या लगतच्या झाडांमुळे गारवा मिळतो. या वनसंपत्तीच्या संरक्षणासाठी वणव्यांवर काबू मिळविण्यासाठी वनविभागाने हॅलो फॉरेस्ट ही दुरध्वनी सेवा सुरू केली आहे. नुकताच कोप्रोली चिरनेर रस्ताच्या कडेला वणवा लागला होता. काही तरूणांना या हॅलो फॉरेस्टच्या सुविधेची माहीती असल्याने त्यांनी थेट संपर्क साधला मात्र वारंवार प्रयत्न करूनही त्यांना ही सेवा नॉट रिचेबल येत राहीली अखेरीस स्थानिकांनी व तरूणांना मिळून ही आग आटोक्यात आणली तर काही वेळाने स्थानिक वनविभागाचे कर्मचारीही पोहचले. ही सेवा संपूर्ण राज्यासाठी असल्याची माहीती या विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

उरण मधील जंगल परिसरात वणवा लागण्याच्या घटना दरवर्षी घडत आहेत. यात उरण परिसरातील जंगलात लागणारे वणवे यामुळे येथील वनसंपत्तीचे दरवर्षी नुकसान होऊ लागली आहे.उरण तालुक्यातील वाढत्या  वाहनांमुळेही तापमान वाढू लागले आहे.तसेच औद्योगिक विकासासाठी निसर्गाचा ऱ्हास होत आहे.