लोकसत्ता प्रतिनिधी : नवी मुंबईतील ऐरोली सेक्टर १० येथील सागर दर्शन सोसायटीमध्ये राहणाऱ्या दोन सख्या बहिणींनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी संध्याकाळी समोर आली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऐरोली सेक्टर १० येथील सागर दर्शन सोसायटी मधील बिल्डिंग नं बी-१५, रूम नंबर २:३ येथे अनेक वर्षापासून वास्तव करणाऱ्या लक्ष्मी पंथारी (३३) व स्नेहा पंथारी (३१) या दोघींनी आत्महत्या केली आहे. यां दोघी बहिणी सुशिक्षित असून लहान मुलांचे क्लासेस घेऊन आपला उदरनिर्वाह करीत होत्या. वडिलांचे आधीच निधन झाले असून दहा वर्षांपूर्वी त्यांची आईने सुद्धा आत्महत्या केली आसल्याचे शेजाऱ्यांनी माहिती दिली मात्र याला पोलिसांनी दुजोरा दिला नाही. दोन दिवस दरवाजा बंद असल्याने अचानक दुर्गंधी सुटल्याने आसपासच्या रहिवाश्यांनी दरवाजा ठोकला परंतु प्रतिसाद मिळाला नाही म्हणून शेजारच्या लोकांनी माजी नगरसेवक विजय चौगुले यांना याबाबत माहिती दिली.. यानंतर चौगुले यांनी घटनास्थळी खातरजमा केल्यावर पोलिसांना संपर्क साधला पोलिसांनी दरवाजा तोडल्यावर आतमध्ये दोन तरुणीचे गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढलून आले. अशी माहिती रबाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश गावडे यांनी दिली.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In airoli two sisters committed suicide by hanging ssh