नवी मुंबई महानगरपालिका टास्क फोर्सच्या विशेष बैठकीत गोवरचा नवीन उद्रेक सुरू झाल्यास ९ महिने ते ते ५ वर्ष वयाच्या बालकांना गोवर रुबेलो लसीचा १ अतिरिक्त डोस तसेच ६ महिने ते ९ महिने वयाच्या बालकांस एमआर लसीचा झिरो डोस देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याची अंमलबजावणीस सुरूवात करण्यात आली होती. त्यानुसार १ ते १४ डिसेंबर पर्यंतच्या अतिरिक्त लसीकरण सत्र मोहीमेत उद्रेक कार्यक्षेत्रामध्ये ६ ते ९ महिने वयोगटातील २४५ बालकांना झिरो डोस तसेच ९ महिने ते ५ वर्ष वयोगटातील १०५६८ बालकांना अतिरिक्त डोस देण्यात आलेले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- नवी मुंबई : कासाडी नदीत प्रदूषण करणाऱ्या त्या कंपनीवर अखेर कारवाई

विशेष गोवर रूबेला लसीकरण मोहिमेची पहिली फेरी १५ ते २५ डिसेंबर या विशेष मोहिमेअंतर्गत पहिल्या फेरीत २३२ लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. एकूण १२४६ बालकांच्या लसीकणाचा कृती आराखडा निश्चित करण्यात आला. या २३२ लसीकरण सत्रांमध्ये २५ डिसेंबरपर्यंत ६५९ लाभार्थी बालकांना म्हणजेच उद्दिष्टापेक्षा जास्त १०५ टक्के बालकांना एमआर लसीचा पहिला डोस देण्यात आला. तसेच उद्दिष्टापेक्षा अधिक ६७७ बालकांना म्हणजेच ११० टक्के बालकांना एमआर लसीचा दुसरा डोस देण्यात आला. अशाच प्रकारे शासन निर्देशानुसार १५ ते २५ जानेवारी २०२३ या कालावधीत विशेष गोवर रूबेला लसीकरण मोहिमेची दुसरी फेरी आयोजित करण्यात येत असून त्याचेही सुयोग्य नियोजन करण्यात येत आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Special measles rubella vaccination campaign achieved more than targeted immunizations in navi mumbai dpj