उरण : जेएनपीए बंदराची खोली वाढल्याने गेटवे टर्मिनल या खासगी बंदरात आज पर्यंतचे सर्वात मोठे मालवाहू जहाज दाखल झाले आहे. ‘एमएससी रेग्युलस’ नावाचे जहाज असून त्याचे कंटेनर क्षमता सुमारे तेरा हजारांवर आहे. आतापर्यंत १२ हजार कंटेनरची क्षमता असलेली जहाजे येत होती. या जहाजाची लांबी ३३६.३७ मीटर आहे. बंदरात यापूर्वी १५.०३ मीटर खोलीपर्यंत मालवाहू जहाज लागली आहेत. मात्र १५.८० मीटर खोलीची क्षमता असलेले महाकाय मालवाहू जहाज पहिल्यांदाच दाखल झाले आहे. पायलट कॅप्टन मनीष कुमार यांनी हे जहाज बंदरात उतरवले. हे मालवाहू जहाज सौदी अरेबियातून जेएनपीए बंदरात आले असून गुजरातमधील मुन्द्रा पोर्टकडे रवाना होणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 20th May 2022 रोजी प्रकाशित
जेएनपीए बंदरात आतापर्यंतचे सर्वात मोठे मालवाहू जहाज; बंदराची खोली वाढवल्याने क्षमतेत वाढ
जेएनपीए बंदराची खोली वाढल्याने गेटवे टर्मिनल या खासगी बंदरात आज पर्यंतचे सर्वात मोठे मालवाहू जहाज दाखल झाले आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 20-05-2022 at 00:02 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The largest cargo ship jnpa port increase port capacity increases capacity ysh