पेट्रोलियम वंगणतेलाचे सहजासहजी जैविक विघटन (बायो-डिग्रेडेशन) होत नाही. त्यामुळे तेलगळती, तेलतवंग यांसारख्या समस्या भेडसावून सोडतात. हवा, पाणी, जमीन यांचे प्रदूषण होते. त्यास पर्याय म्हणून जैविक विघटन होणाऱ्या वंगणतेलांचा तपास केला जात आहे. जैविक इंधने दोन प्रकारच्या वर्गात मोडतात. वनस्पती बियांच्या तेलापासून मिळणारी वंगणतेले वंगणीय कार्यात उत्कृष्ट भूमिका बजावीत असली तरी ती उच्च तापमानाला टिकू शकत नाहीत. तसेच थंड वातावरणात ती चटकन घट्ट बनतात, कारण त्यात संपृक्त मेदाम्ले असतात. याउलट मानवनिर्मित जैविक वंगणतेलांबाबत घडते. ती सिंथेटिक स्वरूपाची असतात. पोली अल्फा ओलििफस (पी.ए.ओ.), डायईस्टर्स आणि पोलिग्लायकोल्स या रसायनांपासून तयार केली जाणारी ही वंगणे थंड वातावरणात व उच्च तापमानालादेखील कार्यरत राहू शकतात. पोलिग्लायकोल्सपासून तयार होणारी वंगणे पाण्यात विरघळू शकतात, त्यामुळे अग्निरोधक हायड्रोलिक वंगणतेले तयार करण्यासाठी त्यांचा वापर होऊ शकतो. अशा प्रकारे जैविक विघटन होणाऱ्यास वंगणतेलांचा वनविभाग, खाणकाम, खनिजतेल, उत्खनन या क्षेत्रांतील यंत्रसामग्रीसाठी विशेष वापर करता येतो. याशिवाय बागकाम, धातुकाम, मासेमारी, जलक्रीडा, बांधकाम इ. ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या साधनसामग्रीत ही वंगणे वापरणे हितावह ठरते.
अर्थात, जैविक विघटन होणाऱ्या वंगणतेलांच्या वापरासंबंधी पुढील मुद्दय़ांचा विचार करावा लागतो. जैविक विघटन क्षमता, निसर्गात उरणारा अंश, मानवी जीवितास हानी, निसर्गातील अन्य सजीवांना होणारी हानी, वाहतूक प्रदूषण, कार्यक्षमता हे ते मुद्दे! संशोधक वनस्पतीज व सिंथेटिक वंगणतेलांची विशिष्ट प्रमाणात सरमिसळ करून कार्यक्षम जैविक वंगणे तयार करीत आहेत.  पुन:पुन्हा वापरता येणारी (रिसायक्लेबल), अधिक कार्यक्षमता असलेली, जीवसृष्टीला हानी न पोहोचवणारी तसेच सहजगत्या विल्हेवाट लावता येणारी वंगणतेले शोधण्यात शास्त्रज्ञ दंग आहेत.
     जर्मनीत ‘ब्लू-एंजल्स’, कॅनडात ‘एन्व्हायर्न्मेंटल चॉइस’, अमेरिकेत ‘ग्रीन सील अँड ग्रीन क्रॉस’, उत्तर युरोपियन देशात ‘व्हाइट स्वान’ तसेच जपानमध्ये ‘इकोमार्क’, अशा अभिनव योजना राबवून पर्यावरणमित्र वंगणतेलांच्या निर्मितीवर भर दिला जात आहे. आपल्या देशातदेखील ओद्यौगिक क्षेत्रे व संशोधन केंद्रातील तज्ज्ञांची समिती कार्यरत असून, ‘इको-मार्क’ या योजनेअंतर्गत संबंधित तत्त्वप्रणाली व नीतिनियम तयार करीत आहेत.
प्रबोधन पर्व: ‘काळा’चा अर्थ
एकोणिसाव्या शतकात महाराष्ट्रात समाजप्रबोधनाला अनेक अंगांनी जी सुरुवात झाली, त्यात वर्तमानपत्रांचा वाटा मोलाचा आहे. १८३२ साली आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी ‘दर्पण’ हे मराठीतले पहिले वर्तमानपत्र सुरू केले. पुढे मुंबई अखबार, प्रभाकर, ज्ञानसिंधू, ज्ञानप्रकाश, ज्ञानोदय, विचारलहरी आणि काळ अशी विविध वर्तमानपत्रे सुरू झाली. या सर्व वर्तमानपत्रांचा मूळ हेतू ज्ञानप्रसार आणि तत्कालीन समाजदर्शन याद्वारे समाजशिक्षण करण्याचा होता. आपल्या ओजस्वी आणि परखड बाण्याने या वर्तमानपत्रांनी एकीकडे ब्रिटिश सत्तेवर मर्मभेदी टीका केली, तर दुसरीकडे महाराष्ट्रीयांच्या मनात स्वातंत्र्य, स्वावलंबन, स्वाभिमान, राष्ट्रवाद आदी मूल्यसंकल्पना िबबण्याचाही प्रयत्न केला. यातील एक महत्त्वाचे वर्तमानपत्र म्हणजे शि. म. परांजपे यांचे ‘काळ’ होय. ते १८९८ साली मुंबईतून सुरू झाले. परांजपे यांचे मराठी भाषेला असणारे सर्वात महत्त्वाचे योगदान म्हणजे वक्रोक्ती-व्याजोक्ती यांचा त्यांनी केलेला शस्त्रासारखा वापर होय. ‘काळ’ हे नाव घेण्यामागचे कारण सांगताना ते लिहितात, ‘‘पूर्वी, पुढें, हल्लीं इत्यादी व्यवहार जे आपण नेहमीं करतों त्या सर्वाना आधारभूत जी कल्पना तिलाच आपण ‘काळ’ असें म्हणतों. काळ हा पदार्थ डोळ्यानें दिसण्यासारखा नाहीं किंवा स्पर्शानें जाणतां येण्यासारखा नाहीं. तरीपण तो डोळ्याला दिसत नाहीं किंवा हाताला लागत नाहीं, म्हणून त्याचें अस्तित्वच नाहीं असें मात्र म्हणतां येणार नाहीं. कारण ज्ञानाचीं द्वारें अनेक आहेत. जें प्रत्यक्ष दिसत नाहीं तें कदचित् अनुमानानें सिद्ध होत असतें; आणि प्रस्तुत विषयाची स्थिति अशीच आहे..काळ हा पदार्थ अस्तिवांत नसता, तर पूर्वाचा काळ, हल्लींचा काळ, पुढचा काळ असले प्रयोग जे आपण पावलोंपावलीं करतों, ते करतां आले नसते. पण ज्या अर्थी ते करतां येतात, त्या अर्थी काळाचें अस्तित्व कबूल करणें भाग आहे.’’     
मनमोराचा पिसारा: हर रंग कुछ कहता है
होली.. होलिकोत्सव हा मुळात होळी पेटवून त्यात आपापली दुष्कर्मे आणि दुरिच्छा जाळून टाकण्याचा मोठा सण. होळी पेटविण्याचा विधी, पूजा इ. गोष्टी रात्री केल्या जातात.
दुसरा दिवस उजाडतो, तो रंगहीन आयुष्यात उजळमाथ्यानं रंग भरण्याचा. प्रत्येक संस्कृतीने विविध रंगांमध्ये आपल्या विचारसरणीचं आणि गौरवाचं प्रतिबिंब शोधलं. त्या रंगलहरींमधून ज्यांना त्यांना आपापल्या धर्माची ऊर्जा मिळाली. पुढे त्या रंगांचं धार्मिकीकरण झालं. आता आपण त्या रंगांकडे निर्भेळ मनानं नाही पाहू शकत. हिंदू धर्मानं अनेक रंग निवडले. स्थलकालानुरूप त्या रंगांचं महत्त्वही बदललं. होळीच्या निमित्तानं या रंगांचा परिचय करू.
मानवी देहांतर्गत ऊर्जेची विशिष्ट स्थानं आहेत. त्या स्थानांना चक्र म्हणतात. ही चकं्र म्हणजे विविध प्रकारच्या मज्जापेशी आणि मज्जा धाग्यांचे गठ्ठे अथवा गाठी (प्लेक्सस) कुंडलिनी शास्त्रानुसार शरीरात सात चकं्र आहेत. चकं्र एरवी स्थिर असतात. म्हणजे त्यांच्यात स्थिती ऊर्जा (स्टॅटिक एनर्जी) असते. श्वासाच्या नियमनानं आपण जणू काही त्या चक्रांमध्ये प्राण फुंकतो आणि त्यामुळे ती चकं्र फिरू लागतात. गतिमान होतात आणि स्थिती ऊर्जेचं गती (कायनेटिक) ऊर्जेत रूपांतर होतं.
या सात चक्रांमधून निर्मित झालेल्या ऊर्जेचं काही खास कार्य असतं. कुंडलिनी जागृतीच्या प्रक्रियेत ही चकं्र कार्यान्वित होतात आणि एकेक करून ही चकं्र मुक्त होऊन आपण ऊर्जामय होतो. कुंडलिनीमधील प्रत्येक चक्राला विशिष्ट रंग बहाल केलेला आहे. ते रंग जणू काही त्या शारीरिक क्रियांचं प्रतिनिधित्व करतात.  
मूलाधार चक्र पाठीच्या कण्याच्या मुळाशी असून, त्याचा रंग लाल असतो. या लाल रंगातून मूलाधार चक्राचं कार्यक्षेत्र लक्षात येतं. या चक्रामधून स्थिरतेचं, जगण्याच्या जबर इच्छेचं कार्य प्रतीत होतं. मूलाधार चक्रातील भावना जोशपूर्ण आणि आक्रमक असतात. त्याचप्रमाणे त्या जीवनाला भक्कम आधार देतात.
तर स्थाधिस्थान चक्र बेंबीच्या खाली आणि जननेंद्रियांच्या वर असते. त्याचा रंग नारिंगी. इथे उत्कट भावना प्रतीत होतात. केवळ जगणं नाही तर पुनरुत्पादन आणि लैंगिक आसक्ती प्रतीत होते. तिसरं चक्र मणिपूर पोटांचा मध्यभाग नाभी. त्याचा रंग पिवळा. या चक्राचं वैशिष्टय़ म्हणजे अधिकार प्रस्थापित करणे. जणू काही आपला अहं ठामपणे मांडण्यासाठी येणारा उद्गार नाभीतून येतो. यात सुवर्णाचे वैभव आहे. चौथं चक्र अर्थात हृदयचक्र अनाहत. याचं रंग हिरवा. निसर्गातील शक्तीचा म्हणजे प्रेमाचा. या रंगातील हिरवाईने मन प्रसन्न होतं. मनामनाची जोडणी करण्याचं सामथ्र्य या चक्रात आहे.
पाचवं चक्र विशुद्ध म्हणजे मानेमधील श्वासनलिकेचं स्थान. याचा रंग निळा. श्वासावाटे वैश्विक ऊर्जेशी इथे जोडलं जातं. सहावं चक्र दोन भुवयांमध्ये आज्ञा चक्र. याचा रंग निळसर (इंडिगो) हे चक्र थेट इडापिंगळा नाडीच्या दिशा बदलाचं. आणि भगव्या रंगाचं सातवं चक्र म्हणजे सहस्रकमचक्र, हजार पाकळ्यांनी उमललेलं कमळ शिरोभागी.
 रंग आता उडवायला नकोत. ते आहेत आपल्यातच..
डॉ.राजेंद्र बर्वे