करोना निर्बंध त्यात ‘एसटी’ बससेवा बंदमुळे विद्यार्थ्यांचे हाल
वाडा: करोनाच्या पार्श्वभूमीवर 23 मार्च 2021 पासुन अचानक एसटी बस सेवा बंद करण्यात आल्याने सवलतीच्या मासिक पासने प्रवास करणारम्य़ा अनेक शालेय विद्यार्थ्यांचे आगावू भरलेले पासचे पैसे वाया गेले. आहेत. एसटी प्रवास बंद असल्यामुळे काही विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन महिनाभर प्रवास करण्यासाठी आगावू पैसे देऊन सहा आसनी रिक्षा आरक्षित केल्या आहेत. मात्र सद्या करोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव पाहता शाळा बंद केल्या तर तोही आर्थिक फटका बसेल या चिंतत विद्यार्थ्यांसह पालकही आहेत.
पालघर जिल्ह्यतील विविध गावखेडय़ातून 20 हजाराहून अधिक विद्यार्थी शहरी भागातील माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यलयात ये-जा करण्यासाठी एसटी बसच्या सवलतीचा प्रवासी पासचा वापर करतात. शालेय विद्यार्थ्यांना या सवलतीच्या प्रवासी पासमध्ये 66.34 टक्के सवलत दिली जाते. करोनाच्या पाष्टद्धr(२२८र्)भूमीवर शाळा व एसटी बस अचानक बंद होण्यापूर्वी पालघर जिल्ह्यतील विविध गावखेडय़ातील पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांचा 20 ते 25 दिवसांच्या पासची मुदत शिल्लक असतानाच शाळा व बस बंद झाल्याने प्रवासी पासची आगावू भरलेली 33.66 टक्के रक्कम वाया गेली आहे. सद्य करोनाचे पुन्हा रुग्ण वाढीस लागले आहेत. शहरातील पहिली ते नववी पर्यंतचे वर्ग बंद करण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील शाळा पुन्हा बंद केल्या गेल्या तर दरोरजचा प्रवास करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सहा आसनी रिक्षांसाठी गुंतविलेला पैशाचे नुकसान होणार आहे.
प्रवास न करता विद्यार्थ्यांचा प्रवासी पास मधील शिल्लक प्रवासाचे दिवस पुढील पास देताना वर्ग करण्यात यावेत.
–सुरेश पाटील, पालक, वाडा.
सद्य एसटी कर्मचारी संपावर असल्याने अनेक ठिकाणची बस वाहतूक बंद आहे. त्यामुळे वरिष्ठांचा आदेश येत नाही. तोपर्यंत नवीन सवलीतचे विद्यार्थी प्रवासी पास देणे बंद करण्यात आले आहेत.
–जगन्नाथ पवार, वाहतूक नियंत्रक,, सवलत प्रवासी पास विभाग