डहाणू : डहाणू शहरामधील घाचीया खाडीत कचऱ्याचा ढीग साचला आहे. प्लास्टिक कचऱ्यामुळे खाडीचे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होत आहे. परिणामी कचरा तुंबून दरुगधी पसरते. त्यामुळे आजार पसरण्याची भीती नागरिकांना आहे.  नगर परिषदेने योग्य ती कारवाई करावी, अशी  मागणी नागरिकांनी केली आहे.

डहाणू शहारातून समुद्रास जोडणार्या घाचीया खाडीच्या जलाराम मंदिराजवळील पुलाजवळ प्लास्टिक पिशव्यांचा खच पडल्याने खाडीचे विद्रुपीकरण झाले आहे.  नगर परिषदेकडून दररोज ओला आणि सुका कचरा जमा करण्याचे व कचरा वाहनामध्ये टाकण्याचे आवाहन नागरिकांना करते. मात्र त्याचे पालन होताना दिसत नाही.   आपण नागरिकांना कचरा वाहनातच कचरा टाकण्याचे आवाहन करत असतो. दररोज कचरा गाडीतुन कचरा डेपोत कचरा नेला जात असल्याचे नगर पालिकेतील कर्मचाऱ्यांनी सांगितले.