कासा: मुंबई अहमदाबाद महामार्गावरील सीमा तपासणी नाका चुकवून अनेक अवजड वाहने तलासरी उधवा मोडगावमार्गे धुंदलवाडी राज्यमार्गाने जाताना दिसतात. त्यामुळे राज्यमार्गावर मोठे खड्डे पडले आहेत. वाहतुकीच्या परवान्यातील क्षमतेपेक्षा अधिक सामान काही वाहने भरतात आणि सीमा तपासणी नाक्यावर न जाता चोररस्त्याचा वापर करतात. यामुळे महसूल तर बुडत आहेच, त्याचबरोबर मोडगाव – धुंदलवाडी रस्त्याची स्थितीही वाईट झाली आहे. रस्त्यावर मोठे खड्डे पडून रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. अपघातांचेही प्रमाण वाढले आहे. शासनाने या विरोधात कारवाई करावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अवजड वाहने वाहतुकीविरोधात बेमुदत धरणे आंदोलनही करण्यात आले आहे.
अवजड वाहनांच्या विरोधात कारवाई करावी, यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी तसेच तलासरी पोलिसांकडे पत्र व्यवहार करूनही कोणतीही कारवाई होत नसल्याने आता आंदोलनाची वेळ आली आहे.
काशिनाथ चौधरी, माजी बांधकाम सभापती
