डहाणू : डहाणू तालुक्यातील तृतीयपंथी समाजाच्या दफनभूमीकरिता डहाणू नगर परिषद क्षेत्रातील मौजे लोणीपाडा येथील भूखंड प्रदान करण्यात आला. स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवप्रसंगी तृतीयपंथी समाजाच्या रेश्मा किरण पवई यांना उपजिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते देण्यात आला. तहसीलदार  अभिजीत देशमुख, नायब तहसीलदार एम. चव्हाण, नायब तहसीलदार विनायक पाडवी व प्रांत कार्यालयामधील सर्व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डहाणू शहरात मौजे मल्यान येथील स.नं. १६६/१ मधील क्षेत्र ०.४०.० हे.आर. इतके क्षेत्र मंजूर करण्यात आले आहे. यामुळे तृतीयपंथींमध्ये समाधान व्यक्त केले. डहाणू तालुक्यातील तृतीयपंथींना ओळखपत्र, आधारकार्ड, शिधापत्रिका, मतदान कार्ड आदी माध्यमांतून त्यांना समाजात स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न केले आहेत. याबरोबर त्यांना विविध शासनाच्या योजना मिळवून देण्यासाठी मदत केली जाणार असल्याचे उपजिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी सांगितले.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Separate burial ground for transgenders in dahanu city zws
First published on: 18-08-2022 at 00:37 IST