डहाणू: तालुक्यातील ओसरविरा मानकरपाडा येथे उंबराच्या झाडावर वीज कोसळल्याने आडोशाला लपलेल्या तीन विद्यार्थ्यांपैकी एकाचा मृत्यू तर तीन विद्यार्थी जखमी झाल्याची घटना आज सायंकाळी चार वाजल्याच्या सुमारास घडली.रविन बच्चु कोरडा 9वी (१६), याचा मृत्यू झाला असून मेहुल अनिल मानकर (8वी), दिपेश सदिप कोरडा (8वी), चेतन माेहन कोरडा (8वी) हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.