-
पंतप्रधान नरेंद्र मोदी पाचव्या टप्प्याच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात आले असता त्यांनी नाशिक येथे महायुतीच्या उमेदवारांकरिता सभा घेतली होती.
-
त्यावेळी इंडिया आघाडीवर टीका करत असताना सभेत उपस्थित असलेल्या एका तरूणाने कांद्यावरून घोषणाबाजी केली होती.
-
त्यानंतर घोषणा देणारा तरूण हा शरद पवार यांचा कार्यकर्ता असल्याचा आरोप दिंडोरीच्या खासदार डॉ. भारती पवार यांनी केला होता.
-
या घोषणाबाजीनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना खुद्द शरद पवार यांनीही या घोषणाबाजीचे समर्थन करत आपली बाजू स्पष्ट केली.
-
लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवारांना पंतप्रधान मोदींच्या सभेत घोषणाबाजी देणार्या तरुणाबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी यावर स्पष्टीकरण दिलं.
-
ते म्हणाले की, “हे खरं आहे तो तरुण मी नाशिकला असताना मला भेटला होता. मी शरद पवारांना मानणारा कार्यकर्ता असं त्याने विधान केलं, पण त्याच्याशी माझा काही संबंध नाही. मोदींच्या सभेत घोषणा देणारा जर कार्यकर्ता माझा असता तर त्याचा मला अभिमान असता की ज्याने हा मुद्दा मांडला”, असे देखील पवार स्पष्टपणे म्हणाले.
-
पुढे याचसंदर्भात बोलताना म्हणाले की, दुसर्या दिवशी तो तरुण मला सुदैवाने भेटला तेव्हा मी त्याला विचारले तू हे कसं केलं? तुझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला का? त्यावेळी त्याने सांगितले की, मी इतक्या रुपयांची कांद्यासाठी गुंतवणूक केली होती पण त्यातून मला २० टक्क्यांचाही पण परतावा मिळाला नाही. ज्या बॅंकेकडून मी कर्ज घेतले होते ती मला सोडणार आहे का? आणि मोदी सभेत फक्त राम मंदिर वैगरे मुद्दे एकदा नाही, तर दहा वेळा बोलत होते मग मला सहन न झाल्याने मी उठून घोषणाबाजी केल्याचे त्या तरुणाने मला सांगितल्याचे पवार म्हणाले.
-
पवारांनी त्या तरुणाने केलेल्या घोषणाबाजीचं समर्थन केलं आणि म्हणाले, त्या तरुणाने काही चुकीचं केल्याचं मला नाही वाटतं. तुमच्या सभेत जर एखादा तरुण उभा राहतो आणि प्रश्न विचारतो तर तुम्हाला इतकी का अस्वस्थता वाटायला हवी? असे प्रकार आमच्या किंवा सगळ्यांच्याच सभेत होत असतात. पण सध्याच्या घडीला भाजपाच्या आणि खासकरुन मोदींच्या सभेत असे काही प्रकार घडले की, त्यानंतर ‘भारत माता की जय’ आणि ‘जय श्रीराम’ची घोषणा दिली जात असल्याची टीका शरद पवारांनी यावेळी केली.
-
(All Photos- Express photo by Ganesh Shirsekar)
मोदींच्या सभेत घोषणा देणाऱ्या तरुणाला शरद पवारांनी विचारलं “तू हे कसं केलंस?…”, तो म्हणाला….
पंतप्रधान मोदींच्या नाशिक येथील सभेत एका तरूणाने कांद्यावरून घोषणाबाजी केली होती, त्यावर शरद पवार यांनी भाष्य करत आपलं स्पष्टीकरण दिलं.
Web Title: Sharad pawar on narendra modis rally onion incident in dindori constituency spl