-
मराठी सिनेरसिकांच्या गळ्यातील ताईत लक्ष्या म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. या लाडक्या अभिनेत्याची आज ६१वी जयंती. ३ नोव्हेंबर १९५४ साली जन्म झालेल्या लक्ष्मीकांत यांनी १६ डिसेंबर २००४ ला जगाचा निरोप घेतला. मात्र त्यांनी साकारलेल्या भूमिका प्रत्येक रसिकाच्या मनात आजही ठसठशीतपणे कोरल्या गेल्या आहेत.
-
सा-या रसिकांचे लाडके लक्ष्मीकांत बेर्डे यांनी चित्रपटाच्या या रंगीत दुनियेत पाऊल ठेवल्यानंतर मराठी चित्रपटातच नाहीतर नाटक आणि हिंदी चित्रपटातूनही स्वतःचा असा वेगळा ठसा उमटवत अनेक भूमिका अजरामर केल्या.
रंगभूमीवरील ‘टुरटुर’ या नाटकातून लक्ष्मीकांत बेर्डे नावाचा नवा तारा उदयास आला. त्यांचे पहिलं नाटक रसिकांनी डोक्यावर घेतले. सगळे सारखेच या चित्रपटातील एक दृश्यात अश्विनी भावे आणि लक्ष्मीकांतजी. ‘शांतता कोर्ट चालू आहे’, ‘बिघडले स्वर्गाचे दार’ अशा नाटकातून लक्ष्मीकांत यांच्यातल्या कसलेल्या अभिनेत्याची ओळख आणखी गडद झाली. त्यानंतर मात्र त्यांनी मागे वळून बघितलेच नाही. दिग्गज बॉलीवूड अभिनेता दिलीप कुमार यांच्यासह लक्ष्मीकांत आणि अशोक सराफ. चित्रपटसृष्टीत त्यांनी पाऊल ठेवले आणि बघता बघता लक्ष्मीकांत बेर्डे हे लहानथोरांचा ‘लाडका आणि हवाहवासा लक्ष्या’ बनले. अचूक टायमिंगमुळे कॉमेडी भूमिकांवर लक्ष्मीकांत यांची विशेष पकड होती. झपाटलेला या चित्रपटातील एक दृश्य. हा चित्रपट लहानांपासून मोठ्यांपर्यंत आजही तितक्याच आवडीने पाहिला जातो. -
दिग्गज अभिनेता दिलीप प्रभावळकर यांच्यासोबत चर्चा करताना लक्ष्मीकांत यांचे दुर्मिळ छायाचित्र.
-
चित्रपटसृष्टीत लक्ष्मीकांत यांनी पाऊल ठेवले आणि बघता बघता लक्ष्मीकांत बेर्डे हे लहानथोरांचा ‘लाडका आणि हवाहवासा लक्ष्या’ बनले. अचूक टायमिंगमुळे कॉमेडी भूमिकांवर लक्ष्मीकांत यांची विशेष पकड होती.
लक्ष्मीकांत यांनी मराठीसोबतचे बॉलीवूडमध्येही आपली जादू दाखविली. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक बड्या कलाकारांसोबत काम केले. 'संग्राम' या चित्रपटात त्यांनी अमरिश पुरी यांच्यासोबत काम केले होते. ‘राजश्री प्रॉडक्शन’च्या ‘मैने प्यार किया’ या चित्रपटात सलमान खानच्या मित्राची भूमिका त्यांनी छान निभावली. हम आपके है कौन चित्रपटातील एक दृश्य. -
लक्ष्मीकांत यांनी विनोदी भूमिका जितक्या सहजतेने आणि लीलया निभावल्या तितक्याच निष्ठेने अनेक गंभीर भूमिकांनाही त्यांनी शंभर टक्के न्याय दिला. मात्र अभिनयाची अष्टपैलू ओळख निर्माण करणा-या अशा गंभीर भूमिका त्यांच्या वाट्याला फार कमी आल्या. या भूमिकांमधून त्यांनी सशक्त अभिनयक्षमता दाखवली असली तरी विनोदी भूमिकांमुळे त्यांच्यावरचा विनोदी अभिनेत्याचा शिक्का कायम राहिला.
-
१९८५ साली आलेल्या ‘धुमधडाका’ चित्रपटातून त्यांनी ख- या अर्थाने धुमधडाका केला. लक्ष्मीकांत, अशोक सराफ आणि महेश कोठारे या तिघांच्या अभिनयाची भट्टी अशी काय जमली की नंतरच्या काळात महेश कोठारे यांनी लक्ष्याला घेऊन चित्रपटांचा धडाकाच लावला.
-
'करायचं ते दणक्यात' या चित्रपटातील मच्छिंद्र कांबळी, लक्ष्या आणि अशोक सराफ यांच्यातील एक दृश्य.
-
बॉलीवूड अभिनेता अनिल कपूरसह लक्ष्मीकांत बेर्डे.
-
मराठीत ‘एक होता विदूषक’ गंभीर नाटकातील भूमिकेने लक्ष्मीकांत यांच्या अभिनयक्षमतेवर शिक्कामोर्तब झाले. पण तशा भूमिका त्यांच्या वाट्याला फार काही आल्याच नाहीत.
-
लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर आणि अशोक सराफ यांच्यातील मैत्री अतूट होती. त्यांच्या मैत्रीचे गोडवे आजही चित्रपटसृष्टीत गायले जातात.
-
लक्ष्मीकांत बेर्डे आणि अक्षय कुमार.
-
१९८५ ते १९९५ या दशकात मराठी चित्रपटांना बहाराचे दिवस दाखविण्यात ज्या मोजक्या लोकांनी महत्त्वाची कामगिरी बजावली त्यात लक्ष्मीकांत बेर्डे यांचा समावेश होता.
-
सायरा बानो यांच्यासह लक्ष्मीकांत यांचे दुर्मिळ छायाचित्र.
-
लक्ष्मीकांत, सतिश शाह, संजय कपूर आणि शक्ती कपूर यांनी मेरे सपनो की राणी या चित्रपटात एकत्र काम केले होते.
-
'नवरा मुंबईचा' चित्रपटातील एक दृश्य.
-
लक्ष्मीकांत आणि रिमा लागू
-
लक्ष्मीकांत यांच्यासह वर्षा उसगावकर आणि अजिंक्य देव.
-
प्रशांत दामले, लक्ष्मीकांत आणि अशोक सराफ
चतुरस्त्र आणि विनोदाचा बादशहा असलेले लक्ष्मीकांत बेर्डे चाहत्यांना अखेर पर्यंत हसवत राहिले.
लाडका आणि हवाहवासा ‘लक्ष्या’
मराठी सिनेरसिकांच्या गळ्यातील ताईत लक्ष्या म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. या लाडक्या अभिनेत्याची आज ६१वी जयंती.
Web Title: Remembering laxmikant berde