-
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधील हिना खान, 'साथ निभाना साथिया' मधील देवोलीना भट्टाचार्यजी आणि अशा अनेक अभिनेत्री तरुण वयातचं मोठ्या मुलांच्या आई झाल्या आहेत. याचं सर्व श्रेय जात ते अर्थातचं टीव्ही इंडस्ट्रीला. केवळ भरजरी कपडे, भरगच्च दागिने, काम, थकवणारे कामाचे तास केवळ याबाबत आता टेलिव्हिजन क्षेत्राकडून मागणी केली जात नाही. तर कलाकारांना त्यांच्या वयापेक्षा कितीतरी वयस्कऱ अशा भूमिका कराव्या लागत आहेत. अशाच काही अभिनेत्रींची ओळख करुन घेऊया.
२८ वर्षीय हिना खान ही ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत ४० वर्षीय आईची भूमिका साकारत आहे. २५ वर्षीय देवोलिना ही साथ निभाना साथिया मालिकेत ४३ वर्षीय आईची भूमिका साकारत आहे. -
२८ वर्षीय तोरल रासपुत्र ही बालिका वधू मालिकेत दोन मुलांच्या आईची भूमिका साकारतेय. मालिकेत आता तिचे वय ३८ वर्ष दाखविण्यात येतेय.
जोधा अकबरमधील परिधी शर्मा आता मालिकेत ४० वर्षांची दाखविण्यात आली आहे. दिया और बाती हम मालिकेतील दिपीका सिंग ही आता जुळ्यां मुलांच्या आईची भूमिका साकारतेय. २८ वर्षीय स्नेहा वाघ ही वीर की अर्दास वीरा या मालिकेत ४५ वर्षीय आईची भूमिका साकारतेय.
कमी वयात या अभिनेत्री झाल्या आई
Web Title: Hina khan devoleena toral rasputra young actresses who play mothers on tv