-
अभिनेता सैफ अली खानने आपण बाबा होणार असल्याची बातमी दिल्यापासून करिना कपूर खान चर्चेत आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून करिना गरोदर असल्याची चर्चा होती. मात्र, या जोडप्याने त्यास कधीच दुजोरा दिला नाही. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच सैफने स्वतःहून आपल्या घरी नवा पाहुणा येणार असल्याचे सांगितले. करिना आणि सैफ हे डिसेंबर महिन्यात आपल्या पहिल्या बाळाचे आगमन करतील.
करिना आणि सैफने गर्भलिंग चाचणी करून बाळाचे लिंग जाणून घेतल्याची चर्चा होती. मात्र, त्या सर्व बातम्या खोट्या असल्याचे समोर आले आहे. नुकतेच, हे जोडपे मुंबई विमानतळावर दिसले. पांढ-या रंगाच्या पलाझो पॅन्ट आणि कुर्तीमध्ये करिना सुंदर दिसत होती. त्यातचं गरोदर असल्यामुळे तिच्या चेह-यावर आलेला तजेलाही यावेळी दिसून येत होता. करिनाच्या प्रेग्नेंसीच्या बातमीनंतर ती आता लवकरचं एक जाहिरात करणार आहे. हेअरस्टाइलिस्ट अधुना अख्तरसाठी ती नव्या हेअर कलर प्रोडक्टची जाहिरात करेल. करिनाने उडता पंजाबद्वारे प्रेक्षकांची प्रशंसा मिळवली. तर सैफ लवकरच रंगून या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येईल. हा चित्रपट १४ ऑक्टोबरला प्रदर्शित होईल. -
काही दिवसांपूर्वीच सैफला अंगठ्याला दुखापत झाल्यामुळे सर्जरी करण्यात आली होती.
बेबी बम्पसह दिसली करिना
Web Title: Kareena kapoor khan flaunts her baby bump while out with husband saif