-
चित्रपटसृष्टीतून राजकारणात आलेली कन्नड अभिनेत्री रम्या पाकिस्तानबाबतच्या विधानाने वादात अडकली आहे. तिच्या विरुध्द कर्नाटकातील मादिकेरीमध्ये एका वकीलाने देशद्रोहाचा खटला भरण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. यावर शनिवारी सुनावणी होईल. (Photo- Facebook)
-
पाकिस्तान नरक नसून, तेथील लोक आपल्यासारखेच आहेत. त्यांनी आमच्यासोबत चांगले वर्तन केल्याचे पाकिस्तानमधील एका कार्यक्रमात सहभागी होऊन मायदेशी परतलेल्या रम्याने म्हटले होते. रम्याचे हे विधान देशाचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकरांनी पाकिस्तानबाबत केलेल्या विधानाच्या बरोबर उलटे आहे. पाकिस्तानात जाणे नरकात जाण्यासारखे असल्याचे ते म्हणाले होते. पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या रम्याचा मनोरंजनक्षेत्रातील प्रवास (Photo- Facebook)
-
रम्याचे खरे नाव दिव्या स्पंदन आहे. तिला रम्या हे नाव कन्नड अभिनेता राजकुमार यांची पत्नी प्रवतम्मा यांनी दिले. ती 'गोल्ड गर्ल' म्हणूनदेखील प्रसिध्द आहे. (Photo- Facebook)
-
बंगळुरूच्या सेंट जोसेफ महाविद्यालयात वाणिज्य शाखेत शिकत असताना 'अभी' चित्रपटात पुनित राजकुमारबरोबर अभिनय करण्याची तिला संधी मिळाली. (Photo- Facebook)
-
रम्याच्या काही जवळच्या मित्रांची मॉडेलिंग एजंसी होती. चित्रपटाचे दिग्दर्शक अभिनेत्रीच्या शोधात असताना त्यांना रम्याचे छायाचित्र दाखविण्यात आले. रम्याच्या मित्रांनी नवीन कॅमेऱ्याद्वारे काढलेले ते छायाचित्र होते. (Photo- Facebook)
-
दोन वेळा फिल्मफेअर उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकणाऱ्या रम्याने तामिळ आणि तेलगू चित्रपटांमधूदेखील अभिनय केला आहे. (Photo- Facebook)
-
२००६ मध्ये 'थन्नम-थन्नम' आणि २०११ मध्ये 'संजू वेड्स गीता' चित्रपटासाठी तिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. (Photo- Facebook)
-
रम्याने २०११ मध्ये युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. २०१३ पर्यंत ती पुर्णपणे राजकारणात सक्रिय नव्हती. २०१३ मध्ये ती खासदार झाली आणि राजकारणात सक्रिय झाली. तिचे वडील आर. टी. नारायण राजकारणातील बडे प्रस्थ होते. (Photo- Facebook)
-
गुजरात मॉडेलविषयी वाचताना चांगले वाटते. परंतु अहमदाबादला गेल्यावर वेगळेच चित्र दिसत असल्याचे मोदींवर टिका करणारी रम्या म्हणाली होती. (Photo- Facebook)
-
रम्याने २०१३ मध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती. कर्नाटकचे तत्कालीन मुख्यमंत्री सिद्धरमैया यांनी रम्याला फोन केला तेव्हा ती दिल्लीत होती. निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एकच दिवस शिल्लक होता. धावतपळत ती दिल्लीवरून बंगळुरूला आली आणि उमेदवारी अर्ज दाखल केला. ज्या दिवशी तिने अर्ज दाखल केला त्या दिवशी तिच्या वडिलांचे निधन झाले. (Photo- Facebook)
-
रम्या तरुण खासदारांपैकी एक आहे. माझे वय पाहून मी खासदार आहे यावर लोकांचा विश्वास बसत नाही, असे तिने एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. (Photo- Facebook)
जाणून घ्या रम्या विषयीच्या या गोष्टी
Web Title: Know about actress turned politician ramya divya spandana