-
बॉलीवूड सेलिब्रिटींच्या मुलांना त्यांच्या आई-वडिलांपेक्षाही मोठा चाहता वर्ग असल्याचे चित्र गेल्या काही वर्षांपासून दिसतेय. काही सेलिब्रिटी किड्स तर सोशल मिडीयावर आपल्या पालकांपेक्षाही ग्लॅमरस फोटो टाकण्यात चार पावलं पुढेच गेले आहेत. अमिताभ यांची नात नव्या नवेली, शाहरुखचा मुलगा आर्यन, सैफची मुलगी सारा, श्रीदेवीची मुलगी खुशी अशी अनेक उदाहरण आहेत. हे सेलिब्रिटी किड्स रुपेरी पडद्यावर येण्याआधीच बॉलीवूडच्या दुनियेत रंगून गेले आहेत. आता या यादीत आणखी एक नाव जोडले गेले आहे. ते म्हणजे आशिकी चित्रपटाने प्रसिद्ध आलेला अभिनेता दीपक तिजोरी याची मुलगी समारा हिचे.
-
दीपक तिजोरीची मुलगी समारा आता २० वर्षांची झाली आहे. तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नजर टाकल्यास ही स्टार किड लवकरचं बॉलीवूड दुनियेत पदार्पण करण्याची तयारीत असल्याचे दिसते.
समाराने काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या वरुण धवन, जॉन अब्राहमच्या 'ढिशुम' चित्रपटासाठी काम केले होते. समाराला अभिनय की चित्रपट दिग्दर्शन यात नक्की कशात रस आहे हे अद्याप कळलेलं नाही. पण तिच्या फोटोंवर नजर टाकल्यास ती नक्कीच अभिनयाला पसंती देईल असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. समारा १३ वर्षांची असताना तिचे अपहरण झाले होते. या घटनेले दीपक तिजोरी अद्याप विसरलेला नाही. २००९ साली समाराचे काही लोकांनी लोखंडवाला जवळील रस्त्यावर अपहरण केले होते. त्यानंतर ते तिला एका हॉटेलमध्ये घेऊन गेले होते. त्यावेळी समाराने प्रसंगावधान राखत अपहरणकर्त्यांची नजर चुकवत स्वतःची सुटका करून घेतली होती. दीपक तिवारीने शिवानी तनेजा हिच्याशी विवाह केला होता. समारा व्यतिरीक्त त्यांना एक मुलगा असून त्याचे नाव करण आहे.
.. या ‘सेलिब्रेटी किड’चे लहानपणी झाले होते अपहरण
Web Title: Daughter of deepak tijori samara tijori hot photos