Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

मनोज जरांगे पाटील

मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नेते असून ते मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. मनोज जरांगे यांचा जन्म १ ऑगस्ट १९८२ रोजी बीड जिल्ह्यातील मारोती या गावात झाला. मात्र, काही वर्षांपूर्वी ते जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये स्थायिक झाले. मनोज जरांगे पाटील यांना पत्नी, चार मुलं, तीन भाऊ आणि आई-वडिल असा परिवार आहे. ते पूर्णवेळ मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी काम करतात. मनोज जरांगे यांचे शिक्षण १२वी पर्यंत झाले आहे.


मनोज जरांगे यांनी काही वर्षांपूर्वी शिवबा या संघटनेची स्थापना केली होती. या संघटनेमार्फत त्यांनी मराठा आरक्षणासाठी गावागावात विविध आंदोलने केली. मनोज जरांगे यांनी २०१२मध्ये ला शहागडच्या उड्डाण पुलावर सात दिवसाच आमरण उपोषण केलं होतं. २०१३ ला शहागड ते मुंबई मराठा आरक्षणासाठी पायी दिंडी काढली होती. यावेळी त्यांनी जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सहा दिवस उपोषण केलं होतं. तसेच छत्रपती संभाजी नगरला रेल्वे रोको आंदोलन केलं होते. २०२१ मध्ये त्यांनी जालन्याच्या साष्ट पिंपळगावमध्ये तब्बल तीन महिने ठिय्या आंदोलन केलं होतं. याशिवाय गोरीगंधारी येथे आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी मराठा आरक्षण लढ्यात मृत पावलेल्या कुटुंबियांना मदत मिळवून दिली होती. मनोज जरांगे २०११ पासून मराठा आरक्षण चळवळीत सक्रीय आहेत.


Read More
manoj jarange patil did not social cause only politics says Narendra Patil
जरांगे यांच्याकडून समाजकारण नव्हे, फक्त राजकारण- नरेंद्र पाटील

कालपर्यंत जरांगे हे समाजकारण करीत होते. परंतु आज ते केवळ पाडापाडीचे राजकारण करीत आहेत, असा आरोप आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास…

Marath Leader Manoj Jarange Patil on Maratha Reservation and criticized BJP
Manoj Jarange on Reservation: भाजपामधील माकडं, जरांगेंची बोचरी टीका

मराठा आरक्षणासंदर्भातील सगळ्या मागण्या अद्याप शासनदरबारी मान्य न झाल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. आज…

manoj jarange patil (3)
Manoj Jarange Patil: “आजच तुम्हाला स्पष्ट सांगतोय, नंतर…”, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा; मध्यरात्रीपासून पुन्हा उपोषण!

Manoj Jarange Patil Hunger Strike: मनोज जरांगे पाटील यांनी मध्यरात्रीपासून पुन्हा उपोषण करण्याचा इशारा दिला असून त्यावरून सरकारवर टीकास्र सोडलं…

Manoj Jarange Patil requested the Dhangar community
Manoj Jarange Patil:”टोकाचं पाऊल उचलू नका!”; मनोज जरांगे यांनी धनगर समाजाला केली विनंती

धनगर उपोषणाला पाठिंबा देण्याचे भाषण करत असताना अमोल देवकाते यांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावर आता मनोज…

Chhagan Bhujbal on Manoj
Chhagan Bhujbal : “आंतरवालीतून जरांगे पाटील निघून गेले होते, रोहित पवारांनी…”, छगन भुजबळांचा दावा!

Chhagan Bhujbal : मराठा आरक्षणासाठी चालू असलेले आंदोलन हे शरद पवारांनी सुरू केल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी यापूर्वीही केला होता.…

Rajendra Raut, Manoj Jarange patil ,
मनोज जरांगे यांच्या आंदोलनातून आघाडीला सत्तेत आणण्याचा डाव, आमदार राजेंद्र राऊत यांचा पुन्हा हल्ला

बार्शीचे भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी गेल्या काही दिवसांत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर संशय…

ganpati decoration based on manoj jarange patil created by family based in pune
Pune: पुण्यात घरगुती गणपतीसमोर साकारलाय मनोज जरांगे पाटलांचा देखावा;

पुण्यासह राज्यभारात सध्या गणेश उत्सवाची धामधूम पाहायला मिळतीये. पुण्यातल्या गणेशोत्सवाचे मुख्य आकर्षण हे गणेशोत्सवातले देखावे असतात. पुण्यात सार्वजनिक गणेश उत्सवाबरोबर…

Manoj Jarange Patil has warned of fielding Maratha candidates in the elections
Manoj Jarange Patil on Vidhansabha:”निवडणुकीचे अर्ज भरण्यासाठी…”;जरांगेंच्या कार्यकर्त्यांना सूचना

मराठा आरक्षणाचा विषय मार्गी न लागल्यास मराठा उमेदवार निवडणुकीत उतरवण्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. विधानसभेच्या तोंडावर सध्या…

Jarange agitation, Mahavikas Aghadi,
जरांगे यांचे आंदोलन महाविकास आघाडीच्या फायद्यासाठी – राजेंद्र राऊत

मराठा आरक्षण आंदोलनाच्या प्रश्नावर बार्शीचे भाजपा पुरस्कृत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांना पुन्हा आव्हान देत,…

संबंधित बातम्या