-
अभिनेता नील नितीन मुकेश आणि रुक्मिणी सहाय विवाहबद्ध झाले आहेत. ती दिवस रंगललेल्या या बहुरंगी विवाहसोहळ्यामध्ये सर्व परंपरा आणि पाहुण्यांचा एकच कल्ला पाहायला मिळाला. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
-
जवळपास ५०० पाहुण्यांच्या उपस्थितीत नील- रुक्मिणीचा हा स्वप्नवत विवाहसोहळा पार पडला. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
-
रुक्मिणीने यावेळी केशरी रंगाची छटा असणारा एक लेहंगा परिधान केला होता. तर नीलही किरमीजी रंगाच्या शेरवानीमध्ये कोणा एका राजकुमाराप्रमाणेच दिसत होता. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
-
या दोघांच्याही कपड्यांचे डिझायनिंग फॅशन डिझायनर सरथ क्रिष्णनने केले होते. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
-
नील आणि रुक्मिणीच्या या विवाहसोहळ्यामध्ये बॉलिवूडमधीलही काही चेहऱ्यांनी हजेरी लावली होती. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
-
सोशल मीडियावरही नीलच्या लग्नाचा राजेशाही थाट चांगलाच चर्चेत आहे. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
नील-रुक्मिणीचा स्वप्नवत विवाहसोहळा
Web Title: Neil nitin mukesh rukmini sahay are married here are the pics from wedding