-
काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री लिसा हेडनने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन तिच्या मुलाचा पहिलावहिला फोटो शेअर केला होता. त्यानंतर आता तिने थेट आपल्या मुलासोबतच्या फोटोशूटचाच फोटो सर्वांसमोर आणला आहे. 'हार्पर बाजार' या मासिकाच्या कव्हर पेजसाठी तिने हे फोटोशूट केलं. इन्स्टाग्रामवरही हे फोटो सध्या बरेच चर्चेत आले असून, लिसा आणि तिच्या गोंडस झॅकने अनेकांचं लक्ष वेधलं आहे. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम/ @danielbauermakeupandhair)
-
'क्वीन' आणि 'ऐ दिल है मुश्किल' या चित्रपटांमध्ये लिसा झळकली होती. या चित्रपटांमधून तिने आपली वेगळीच ओळख प्रस्थापित केली. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम/ @danielbauermakeupandhair)
-
सध्याच्या घडीला ती मातृत्त्वाची जबाबदारी पूर्ण करत असून, आपलं करिअर आणि कुटुंब यांमध्ये समतोल साधत आहे. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम/ @danielbauermakeupandhair)
-
लिसा तिच्या मुलाचे काही सुरेख फोटो आणि त्याच्यासोबतचे काही गोड क्षण नेहमीच सोशल मीडियावर पोस्ट करत असते. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम/ @danielbauermakeupandhair)
-
अभिनयासोबतच लिसा मॉडेलिंग जगतातही बरीच सक्रिय आहे. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम/ @danielbauermakeupandhair)
-
(छाया सौजन्य- इन्स्टाग्राम/ @danielbauermakeupandhair)
लिसा- झॅकचे पहिलेवहिले फोटोशूट
Web Title: Bollywood actress lisa haydon with son zack from harpers bazaar magazine latest edition