अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांची मुलगी आराध्याचा नुकताच सहावा वाढदिवस अगदी थाटात पार पडला. या वाढदिवसाला सिनेसृष्टीतील अनेक कलाकार आपल्या मुलांना घेऊन आले होते. १६ तारखेला जेडब्ल्यू मॅरियट हॉटेलमध्ये कुटुंबातील सदस्यांसोबत बच्चन कुटुंबीयांनी एकत्र डिनर केला. -
१८ तारखेला मुलांसाठी खास थीम पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या थीममध्ये पाळण्यापासून, म्हातारीच्या केसांपर्यंत साऱ्याच गोष्टींची रेलचेल होती.
-
या पार्टीत बच्चे कंपनीने तर मजा केलीच पण शाहरुख आणि अभिषेकही त्यांच्यासोबत लहान झाले होते. त्यांनीही अब्रामसोबत पाळण्यात बसून लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला.
-
दुसरीकडे अमिताभ बच्चन यांनी अब्रामला 'बुड्ढी के बाल' खाऊ घातले.
-
'बुड्ढी के बाल' तयार होत असताना अब्राम एकटक पाहत होता आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बिग बी पाहत होते.
-
आजी जया बच्चन यांना केक भरवताना आराध्या.
-
शिल्पा शेट्टीपासून ते आमीर खानपर्यंत आणि फराह खानपासून डब्बू रत्नानीपर्यंत सारेच सेलेब्स आपल्या मुलांसोबत या पार्टीचा आनंद घेताना दिसले.
-
सोनाली बेंद्रे ही आपल्या मुलाला घेऊन आली होती.
-
फराह खान तिच्या तीन मुलांसह
आराध्याच्या बर्थ डे पार्टीत शाहरुख आणि अब्रामचा ‘उंच झोका’
Web Title: When shah rukh khan abram khan and abhishek bachchan rode the ferris wheel in aaradhya bachchan birthday party