• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. honar soon mi hya gharchi fame rohan gujar aka pintya wedding photo

.. असा पार पडला ‘होणार सून..’ फेम रोहनचा लग्नसोहळा

Updated: September 10, 2021 14:21 IST
Follow Us
  • सध्या डेस्टिनेशन वेडिंगचा ट्रेण्ड सर्वत्र रुळला आहे. त्यात नवरानवरीच सेलिब्रिटी असतील तर लग्न हा इव्हेंटच होऊन जातो. पण 'होणार सून..' फेम पिंट्या आणि आता 'लव्ह लग्न लोचा' मालिकेत राजाच्या भूमिकेत असलेला रोहन गुजर आणि त्याची मैत्रीण स्नेहल देशमुख यांनी मात्र हटके लग्न केलं.
    1/8

    सध्या डेस्टिनेशन वेडिंगचा ट्रेण्ड सर्वत्र रुळला आहे. त्यात नवरानवरीच सेलिब्रिटी असतील तर लग्न हा इव्हेंटच होऊन जातो. पण 'होणार सून..' फेम पिंट्या आणि आता 'लव्ह लग्न लोचा' मालिकेत राजाच्या भूमिकेत असलेला रोहन गुजर आणि त्याची मैत्रीण स्नेहल देशमुख यांनी मात्र हटके लग्न केलं.

  • 2/8

    साईबाबांचं मंदिर, भटजीबुवा, दोघांचे आईबाबा, सख्खी भावंडं अशा फक्त १५ वऱ्हाडींच्या साक्षीने रोहन आणि स्नेहल यांनी सहजीवनाच्या प्रवासाला सुरूवात केली.

  • 3/8

    होणार सून मी या घरची, बन मस्का आणि आता लव्ह लग्न लोचा या मालिकेत रोहन गुजर याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. पण याच रोहनने १५ वर्षापूर्वी मैत्रीण स्नेहल हिचे मन जिंकले.

  • 4/8

    दीड दशकाच्या खास मैत्रीनंतर रोहन आणि स्नेहलने लग्नाचा निर्णय घेतला. पण रोहनला डामडौल करत लग्न करायचं नव्हतं. लग्नातला खर्च टाळण्यासाठी नव्हे तर लग्नासारखा आपल्या आयुष्यातील खास सोहळा कुटुंबीयांच्या सानिध्यात व्हावा यासाठी रोहनने अगदी साध्या पद्धतीने लग्न केले.

  • 5/8

    अभिनेता रोहन आणि झी वाहिनीसाठी डिजिटल हेड म्हणून काम करणाऱ्या स्नेहलचा मित्रपरिवार खूप मोठा आहे. त्यामुळे लग्नाला न बोलवल्याबद्दल मित्रमैत्रीणींकडून ओरडूनही घ्यावे लागले. पण रोहनचा फंडा ऐकून आता त्याच्या काही मित्रांनी अशाच प्रकारे लग्न करण्याचा मानस बोलून दाखवला आहे.

  • 6/8

    सकाळी मंदिरात लग्न झाल्यानंतर गुजर आणि देशमुख कुटुंबाने एका हॉटेलमध्ये मस्त एकत्र जेवण केलं आणि दुपारी ही मंडळी रोहनच्या घरीही आली.

  • 7/8

    लग्नानंतर तीन-चार दिवसात रोहन 'लव्ह लग्न लोचा' मालिकेच्या शूटसाठी हजर राहिला.

  • 8/8

Web Title: Honar soon mi hya gharchi fame rohan gujar aka pintya wedding photo

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.