-
'तुमच्यासाठी काय पन' या कार्यक्रमाच्या गाजावाजा जंक्शनवर दर आठवड्यामध्ये वेगवेगळे कलाकार हजेरी लावतात. यावेळेस मराठी सिनेसृष्टीतला आणि प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात अढळ स्थान निर्माण केलेला अभिनेता या मंचावर आला आणि जेव्हा तो आला तेव्हा त्याने सगळ्यांचीच मनं जिंकली.
-
या आठवड्यामध्ये 'तुमच्यासाठी काय पन'च्या मंचावर अंकुश चौधरी, तेजस्विनी पंडित, स्पृहा जोशी आणि अमित राज यांनी हजेरी लावली. अंकुशची मंचावर एक नाही तर तीन वेळा धम्माकेदार एन्ट्री झाली. एकदा अंकुश हार्नेसने मंचावर आला तर एकदा चक्क काच तोडून, त्यामुळे तुमच्यासाठी काय पन या अतरंगी शोप्रमाणे आणि त्याच्या देवा या अतरंगी चित्रपटाप्रमाणे अंकुशची एन्ट्री देखील अतरंगी तसेच धमाकेदार झाली असं म्हणायला हरकत नाही.
-
तुमच्यासाठी काय पनचा हा खास भाग प्रेक्षकांना येत्या गुरुवारी आणि शुक्रवारी रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर बघायला मिळेल.
-
कार्यक्रमामध्ये जर एन्ट्रीच इतकी भारी झाली असेल तर या सगळ्यांनी मिळून किती मज्जा – मस्ती केली असेल हे तुम्हाला कळलचं असेल. तेजस्विनी आणि स्पृहा यांनी Ramp Walk केला. कार्यक्रमामधील विनोदवीरांनी काही धम्माकेदार स्कीट या कलाकारांसमोर समोर सादर केले.
-
किशोर चौघुले, समीर चौघुले, अरुण कदम आणि विशाखा सुभेदार यांनी मिळून एक धम्माल स्कीट सादर केले तसेच विरुष्काच्या लग्नावरही धम्माल विनोदी स्कीट सादर केले.
-
शेवटी जिंतेद्र जोशीने मंचावर हजेरी लावत अंकुशला झकास सरप्राईज मिळाले. त्याने अंकुशबद्दल बऱ्याच गंमतीदार आणि त्यांच्या मैत्रीबद्दलच्या काही गोष्टी सांगितल्या.
अंकुश म्हणतो, ‘तुमच्यासाठी काय पन’
Web Title: Ankush chaudhary spruha joshi deva pramotion on tumchyasathi kay pan