-
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचे पहिले वेडिंग रिसेप्शन २१ डिसेंबरला दिल्लीत पार पडले.
-
प्रसार माध्यमांचा घोळका टाळण्यासाठी या स्टार कपलने ११ डिसेंबरला इटलीत डेस्टिनेशन वेडिंग केले होते.
-
त्यानंतर आपले नातेवाईक आणि मित्रपरिवारासाठी या दोघांनी दिल्ली आणि मुंबई येथे रिसेप्शन ठेवले. या रिसेप्शनला पंतप्रधान नरेंद्र मोदींची विशेष उपस्थिती पाहायला मिळाली.
-
येत्या २६ तारखेला मुंबईत विरुष्काच्या लग्नाचे दुसरे रिसेप्शन होणार आहे.
-
या नवदाम्पत्याला आशीर्वाद देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा काल उपस्थित राहिले होते.
-
यावेळी विराट आणि अनुष्का या दोघांनीही सेलिब्रिटी फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जीने डिझाईन केलेले कपडे घातले होते.
-
शिखर धवन आणि सुरेश रैना यांनी विराटच्या रिसेप्शनला हजेरी लावली होती.
-
अनुष्का आणि विराटवरच सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या.
-
रिसेप्शनच्या वेळी बनारसी साडीमध्ये अनुष्का सुरेख दिसत होती.
-
सुरेश रैना आणि त्याच्या पत्नीने विराट, अनुष्काला शुभेच्छा दिल्या.
-
सर्वांच्याच नजरा लागून राहिलेल्या या रिसेप्शनमध्ये विराट, अनुष्का सर्वांची विचारपूस करत होते.
-
यावेळी प्रत्येकाने या नवविवाहित स्टार जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव केला.
-
आता सर्वांचेच लक्ष त्यांच्या मुंबईतील रिसेप्शनकडे लागून राहिले आहे.
Virushka Reception Inside Pics : विराट-अनुष्काचे ‘वेडिंग रिसेप्शन’
Web Title: Virat kohli anuskha sharma wedding reception in new delhi see inside pics