• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actors adinath and urmila kanitkar kothare girl naming ceremony jiza

आदिनाथ- उर्मिलाच्या चिमुकलीचे नाव कळले का?

आदिनाथ आणि उर्मिला कोठारे यांना १८ जानेवारीला कन्यारत्न झाले

Updated: September 10, 2021 14:19 IST
Follow Us
  • मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध जोडी आदिनाथ आणि उर्मिला कोठारे यांना १८ जानेवारीला कन्यारत्न झाले. आदिनाथने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून मुलगी झाल्याची गोड बातमी दिली होती. मुलीच्या जन्मानंतर उर्मिलाने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. पण त्यात तिचा चेहरा मात्र दिसत नव्हता.
    1/6

    मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध जोडी आदिनाथ आणि उर्मिला कोठारे यांना १८ जानेवारीला कन्यारत्न झाले. आदिनाथने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून मुलगी झाल्याची गोड बातमी दिली होती. मुलीच्या जन्मानंतर उर्मिलाने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. पण त्यात तिचा चेहरा मात्र दिसत नव्हता.

  • 2/6

    आता मुलीच्या बारशाच्या निमित्ताने आदिनाथ आणि उर्मिलाने त्यांच्या मुलीचा चेहरा सर्वांना दाखवला. दोघांनी मुलीचे नाव जिजा असे ठेवले. जिजाचे बारशाचे फोटो सध्या सोशल मीडियावर भलतेच व्हायरल होत आहेत.

  • 3/6

    उर्मिला आणि आदिनाथने अगदी मराठमोळा पेहराव केला होता. तर जिजालाही खणाचं परकर पोलकं घातलं आहे. उर्मिलाने यावेळी हिरव्या रंगाची साडी नेसली होती. या साडीला साजेसे दागिनेही तिने घातले होत. तर आदिनाथने सदरा पायझमा आणि त्यावर कोट घातला होता. आदिनाथने यावेळी मराठमोळा फेटाही बांधला होता. या तिघांच्या फोटोंवरुन त्यांच्या चाहत्यांची नजर हटत नाही हे मात्र खरं.

  • 4/6

    पहिलं बाळ हे प्रत्येक दाम्पत्याच्या आयुष्यात नवे अनुभव घेऊन येतं. आदिनाथ आणि उर्मिला सध्या हात अनुभव घेत असतील यात काही शंका नाही.

  • 5/6

    उर्मिला आणि आदिनाथ दोघंही सोशल मीडियावर सतत सक्रीय असल्याने त्यांच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण ते आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असतात. यावेळीही त्यांनी जिजाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

  • 6/6

    महेश कोठारे यांनीही त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून जिजाच्या बारशाचे काही फोटो शेअर केले.

Web Title: Marathi actors adinath and urmila kanitkar kothare girl naming ceremony jiza

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.