-
प्रेम… ही एक अशी उत्कट भावना आहे जी व्यक्त केल्यानंतर आयुष्यातील बरीच समीकरणं क्षणार्धात बदलून जातात. अर्थात याला काही अपवादही ठरतात. प्रत्येक प्रेमकहाणी सुरु झाल्यापासून त्यात बरीच वळणं येतात आणि याच वळणांमधून ही सिद्ध होतं ते म्हणजे त्या प्रेमकाहणीचं वेगळेपणं. बी- टाऊनमध्ये सध्या अशाच एका प्रेमकहाणीला एक नवं वळण मिळालं असून, त्या जोडीच्या नव्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. ज्या जोडीच्या प्रेमकहाणीने सर्वांचल लक्ष वेधलं ती जोडी म्हणजे मिलिंद सोमण आणि अंकिता कोनवार.
-
मिलिंद सोमण, अंकिता कोनवार
-
अलिबागमध्ये मराठी आणि आसामी अशा दोन्ही पद्धतींच्या रितींनुसार हा विवाहसोहळा पार पडला.
-
यावेळी दोघांचेही कुटुंबिय आणि मित्रपरिवाराची उपस्थिती पाहायला मिळाली.
-
सोशल मीडियावरही या मॅरेथॉन कपलच्या नव्या इनिंगचीच चर्चा पाहायला मिळाली.
-
यावेळी प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत असल्याचं पाहायला मिळालं.
-
तरुणींमध्ये मिलिंदची असणारी लोकप्रियता पाहता त्याच्या या नव्या इनिंगमुळे हजारो तरुणींचा हा आवडता आयर्नमॅन आता कोणा दुसरीचाच झाला आहे असंच म्हणावं लागेल.
-
मिलिंद सोमण आणि अंकिता कोनवार यांच्या प्रेमप्रकरणाची गेल्या बऱ्याच दिवसांपासून प्रचंड चर्चा सुरु असल्याचं पाहायला मिळालं.
-
अगदी त्यांच्या नात्यात दुरावा आल्या अफवाही लग्नाच्या अवघ्या दोन दिवस आधी सर्वांचं लक्ष वेधून गेल्या.
-
या सर्व अफवांना खोटं ठरवत अखेर ही जोडी लग्नबंधनात अडकलीच.
मॅरेथॉन कपलच्या नव्या इनिंगला सुरुवात…
प्रत्येक प्रेमकहाणी सुरु झाल्यापासून त्यात बरीच वळणं येतात आणि याच वळणांमधून ही सिद्ध होतं ते म्हणजे त्या प्रेमकाहणीचं वेगळेपणं.
Web Title: Bollywood actor model iron man milind soman weds girlfriend ankita konwar see some stunning pictures of the just married couple straight from the wedding