-
फातिमा सना शेख- या वर्षीचा सर्वात मोठा चित्रपट अशी चर्चा असलेला ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’मध्ये फातिमा सना शेख झळकणार आहे. जाफिरा असं फातिमाच्या भूमिकेचं नाव असून एका धाडसी योद्धाच्या पोशाखात ती पाहायला मिळत आहे.
-
लॉयड ओवेन- प्रत्येक चित्रपटामध्ये एक तरी खलनायक हा असतोच असतो.अशाच एका खलनायकाच्या भूमिकेमध्ये लॉयड ओवेन झळकणार असून तो ईस्ट इंडिया कंपनीच्या एका अधिकाऱ्याची भूमिका पार पाडणार आहे.
कतरिना कैफ – दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणाऱ्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’मध्ये कतरिना कैफ ग्लॅमर अंदाजात झळकणार आहे. या चित्रपटातील तिच्यावर चित्रीत करण्यात आलेल्या सुरैय्या हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. आमिताभ बच्चन- ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’च्या या मोशन पोस्टरमध्ये बिग बी साकारत असलेल्या भूमिकेचं नावं आणि त्यांचा लूक पाहायला मिळतो. ‘खुदाबक्श, ठग्सचा सेनापती’ अशी ओळख बिग बींच्या भूमिकेची करण्यात आली आहे. -
आमिर खान – आमिर या चित्रपटात ‘फिरंगी’च्या भूमिकेत आहे. आमिरचा हा लूक ‘पायरेट्स ऑफ कॅरेबिअयन’मधल्या जॅक स्पॅरोच्या जवळ जाणारा आहे. त्यामुळे ठग्स ‘पायरेट्स ऑफ कॅरेबिअयन’चं देसी व्हर्जन आहे की काय अशा चर्चा रंगत आहे.
Thugs of Hindostan : भेटा ‘हिंदोस्तान’च्या या ठग्सना
या चित्रपटात बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर आणि बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत.
Web Title: Meet the artists of thugs of hindostan