बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया लवकरच आई होणार आहे. त्यामुळे काही दिवसापूर्वीच नेहा आणि पती अंगदने या गोड बातमीचं सेलिब्रेशन केलं. त्यासाठी बेबी शॉवर पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी नेहासाठी अंगदने एक मोठा केक आणल्याचं पाहायला मिळालं. नेहाच्या बेबी शॉवर पार्टीत सोहा अली खान, कुणाल खेमू, प्रिती झिंटा, इलियाना डिक्रूझ, कोंकणा सेनसहीत अनेक बॉलिवूडची मंडळी दिसून येत आहेत. या पार्टीमध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी उपस्थिती दर्शविली होती. नेहा अंगदचा आनंद द्विगुणित करण्यासाठी त्यांच्या जवळच्या व्यक्तींनी या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली होती. आयोजित पार्टीमध्ये नेहाने पांढऱ्या रंगाचा गाऊन घातला असून ती प्रिन्सेस लूकमध्ये दिसून येत होती.
नेहा धुपियाच्या बेबी शॉवरचे फोटो पाहिलेत का ?
त्यासाठी बेबी शॉवर पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं.
Web Title: Neha dhupia baby shower function