बॉलिवूड ते 'क्वांटिको गर्ल' असा प्रवास करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा लवकरच अमेरिकन गायक निक जोनाससोबत लग्नगाठ बांधणार आहे. काही दिवसापूर्वीच प्रियांकाने तिची ब्राइडल पार्टी सेलिब्रेट केली. त्यानंतर आता बॅचलरेट पार्टीदेखील ती एन्जॉय करत आहे. प्रियांकाने तिच्या बॅचलरेट पार्टीचं अमेरिकेत आयोजन केलं असून यात गोल्डन आणि पिंक रंगाची थीम ठेवण्यात आली होती. त्यामुळे पार्टी आयोजित केलेल्या ठिकाणी सोनेरी आणि गुलाबी रंगाच्या फुलांनी, फुग्यांनी सजावट करण्यात आली होती. या पार्टीला प्रियांकाच्या जवळच्या मैत्रिणी उपस्थित होत्या. प्रियांकाने ही पार्टी मनमुरादपणे एन्जॉय केल्याचं दिसून येत आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, प्रियांका -निक २ डिसेंबर रोजी जोधपूरमध्ये लग्नगाठ बांधणार आहेत.
अमेरिकेत रंगली ‘क्वांटिको गर्ल’ ची बॅचलरेट पार्टी
पार्टीमध्ये गोल्डन आणि पिंक रंगाची थीम ठेवण्यात आली होती.
Web Title: Priyanka chopra bachelorette party inside pictures