
सई ताम्हणकर. सईने आतापर्यंत अनेक चित्रपटांच्या माध्यमातून अभिनयाची झलक दाखविली आहे. मराठीप्रमाणेच हिंदी चित्रपटामध्येही तिने नशीब आजमावलं आहे. सईने अभिनयानंतर तिचा मोर्चा क्रीडा क्षेत्राकडे वळविला आहे.तिने 'महाराष्ट्र कुस्ती दंगल' या कुस्ती लीगमध्ये एक टीम विकत घेतली आहे. आतापर्यंत केवळ बॉलिवूडमधील कलाकारचं खेळाडूंचा संघ विकत घेत होते. मात्र आता पहिल्यांदाच एका मराठमोळ्या अभिनेत्रीने कुस्तीचा संघ विकत घेतला आहे. सई ताम्हणकरने ‘कोल्हापूर मावळे’ ही टीम विकत घेतली आहे. त्यामुळे सध्या ती या टीमसोबत पुण्यात आहे. या टीमला प्रोत्साहित करण्यासाठी सई कायम लीगच्या वेळी हजर असते.
कुस्तीच्या मैदानात ‘कोल्हापुरी मावळ्यां’सोबत सईची एण्ट्री
Web Title: Actress sai tamhankar cheering up with her team kolhapuri mavale at pune