
नावाजलेल्या पुरस्कार सोहळ्यांपैकी एक असलेल्या 'लक्स गोल्डन रोज अॅवॉर्ड २०१८' मध्ये बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने लाल रंगाचा ड्रेस घातला होता. या ड्रेसमध्ये तिचं सौंदर्य आणखी खुललं असून ती प्रचंड सुंदर दिसत होती. 'धडक' चित्रपटामुळे घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री जान्हवी कपूरने पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला होता. '2.0' या चित्रपटामुळे सध्या सतत चर्चेत येत असलेला खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार या पुरस्कार सोहळ्यात उपस्थित होता. प्रत्येक पुरस्कार सोहळ्यामध्ये परफॉम करणारा अभिनेता वरूण धवन लक्स गोल्डनच्या पुरस्कार सोहळ्यामध्ये काळ्या रंगाच्या ब्लेझरमध्ये आला होता. अभिनेत्री आलिया भटने पांढऱ्या रंगाचा कॉरसेट गाऊन घातला होता. बॉलिवूडची बेबो अर्थात अभिनेत्री करिना कपूरने या सोहळ्याला शोभेल असा गुलाबी रंगाचा ड्रेस घातला होता. यामध्ये ती अत्यंत साधी आणि सुंदर दिसत होती.
Lux Golden Rose Awards 2018 : रेड कार्पेटवर सेलिब्रेटींचा अनोखा अंदाज
Web Title: Lux golden rose awards aishwarya alia bhatt photo