उद्योगपती मुकेश अंबानी यांची लाडकी लेक इशा अंबानीने बुधवारी १२ डिसेंबर रोजी आनंद पिरामल यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. मुंबईतील 'अँटीलिया' या अंबानी कुटुंबियांच्या आलिशान इमारतीत हा सोहळा पार पडला. लग्नानंतर १४ डिसेंबरला या जोडीचं ग्रॅण्ड वेडिंग रिसेप्शन सोहळाही पार पडला. मुंबईतील जिओ गार्डन येथे या रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी इशाने गोल्डन रंगाचा लेहंगा परिधान केला होता. तर आनंदने काळ्या रंगाचा सूट घातला होता. या सोहळ्यामध्ये अंबानी कुटुंबियांची भावी सून श्लोकादेखील उपस्थित होते. त्याप्रमाणेच बॉलिवूडपासून राजकारण आणि क्रीडाविश्वापासून ते उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळींची उपस्थिती पाहायला मिळाली. या रिसेप्शन पार्टीमध्ये मुकेश अंबानी आणि निता अंबानी प्रचंड खूश दिसत होते.
Photo : पाहा, इशा-आनंदच्या ग्रॅण्ड रिसेप्शनचे फोटो
Web Title: Isha ambani wedding reception photo