-
बॉलिवूडमधला सर्वात मोठा विवाहसोहळा या महिन्याच्या सुरूवातीला पार पडला. हा सोहळा होता 'देसी गर्ल' प्रियांका आणि अमेरिकन गायक निक जोनास यांचा.
-
राजस्थानमधल्या जोधपुर येथे १ आणि २ डिसेंबरला ख्रिश्चन आणि पारंपरिक भारतीय पद्धतीनं हे दोघंही विवाहबंधनात अडकले. मात्र या सोहळ्याचं सेलिब्रेशन अजूनही संपलेलं नाही.
दोन आठवड्यापूर्वी विवाहबंधनात अडकलेल्या या जोडप्यानं १९ डिसेंबरला मुंबईत फक्त खास व्यक्तींसाठी रिसेप्शन पार्टीचं आयोजन केलं होतं. -
या पार्टीसाठी प्रियांकानं प्रसिद्ध डिझायनर सब्यासाचीचा लेहंगा परिधान केला होता. प्रियांकासाठी खास हा लेहंगा तयार करून घेण्यात आला होता.
-
या पार्टीसाठी प्रियांकाचा मुंबईतील अत्यंत जवळचा मित्रपरिवार आणि काही मोजकेच नातेवाईक उपस्थित होते.
-
प्रियांकानं मुंबईत आणखी एका रिसेप्शन पार्टीचं आयोजन केलं आहे. ही पार्टी फक्त बॉलिवूडसाठी असणार आहे
-
प्रियांका चोप्रा निक जोनास
खास व्यक्तींसाठी प्रियांका-निकची आलिशान रिसेप्शन पार्टी
Web Title: Isha ambani anand piramal wedding photos bollywood indian politicians sports personalities marked their presence