कलाविश्वामध्ये प्रत्येक सण, उत्सव मोठ्या धुमधडाक्यात सेलिब्रेट केला जातो. यातीलच एक दिवस म्हणजे रंगपंचमी. रंगपंचमी म्हणजे बॉलिवूडकरांसाठी खास दिवस. या दिवशी अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींकडे होळी पार्टींच आयोजन करण्यात येतं. आयोजित करण्यात आलेल्या या पार्टीजमध्ये बॉलिवूड सिनेमांतील गाणी असो किंवा दृष्ये होळीचा रंग दिसला नाही तर जणू या क्षेत्रातील झगमगच फिकी पडेल. सेलिब्रिटींनी मागील काही वर्षात रंगांचा उत्सव कसा साजरा केला यावर एक नजर टाकूयात.. राज कपूर यांनी सिनेमावाल्यांच्या होळीला प्रतिष्ठा दिली. पन्नासच्या दशकात चेंबूरच्या आर. के. स्टुडिओत या होळी पार्टीला सुरुवात झाली. या मैदानामध्ये असलेल्या भल्या मोठ्या हौदात सगळे सेलिब्रिटी रंगपंचमीचा मनमुराद आनंद लुटत असतं. ललिता पवार आणि राज कपूर यांचा दुर्मिळ फोटो बॉलिवूडच्या होळी पार्टीत अमिताभ बच्चन -
अभिषेक बच्चन
Holi throwback : जेव्हा बॉलिवूडचे दिग्गज होळीच्या रंगात रंगले
Web Title: Holi throwback how bollywood star raj kapoor celebrated the festival of colours holi throwback %e0%a4%9c%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%be %e0%a4%ac%e0%a5%89%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%b5