-
कंगना रणौत
तिच्या या खडतर प्रवासाला ‘क्वीन’ चित्रपटाच्या रुपाने यशाचा मार्ग गवसला. या चित्रपटात तिने साकारलेल्या भूमिकेसाठी जवळजवळ सर्व पुरस्कार सोहळ्यातून तिने उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला. क्वीन चित्रपटाच्या यशानंतर कंगनाने स्वत:ला बॉलिवूडमध्ये सिद्ध करुन दाखवलं. या चित्रपटानंतर तिने अनेक दमदार भूमिकांना न्याय दिला. काही महिन्यांपूर्वीच तिचा 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या निमित्ताने तिने अभिनयानंतर निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं आहे. विशेष म्हणजे कंगना आता तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या बायोपिकमध्ये झळकणार आहे. या चित्रपटात कंगना जयललिता यांची भूमिका साकारणार आहे.
Photo : हॅप्पी बर्थडे कंगना!
Web Title: Happy birthday kangana ranaut birthday special