-

जेव्हा राज कपूर नर्गिस यांच्या प्रेमात पडले
-
हिंदी चित्रपटसृष्टीतील एक महत्वाचे आणि महान व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे नर्गिस. १ जून १९२९ साली कोलकातामध्ये जन्मलेल्या नर्गिस यांची ३ मे रोजी पुण्यतिथी. नर्गिस यांचे वडिल उत्तमचंद मोहनचंद पेशाने डॉक्टर होते आणि आई जद्दनबाई. नर्गिस यांना वडिलांप्रमाणे डॉक्टर व्हायचे होते. परंतु आईमुळे नर्गिस वयाच्या चौथ्या वर्षी कॅमेऱ्यासमोर उभ्या राहिल्या.
-
नर्गिस यांनी 'मदर इंडिया' या चित्रपटातील सहाय्यक कलाकार सुनील दत्त यांच्याशी १९५८मध्ये लग्न केले. 'मदर इंडिया' या चित्रपटात नर्गिस यांनी सुनील दत्त यांच्या आईची भूमिका साकारली होती.
-
याआधी नर्गिस आणि बॉलिवूडमधील अजरामर व्यक्तिमत्व असलेले राज कपूर यांचे नाते प्रचंड गाजले होते. सलग १८ वर्षे एकत्र काम करत नर्गिस आणि राज या जोडीने रुपेरी पडदा गाजवला होता. पण एकत्र काम करता करता ते एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले.
-
'बरसात' या चित्रपटाच्या चित्रीकरणदरम्यान नर्गिस आणि राज कपूर यांच्या नात्याला सुरुवात झाली.
-
राज कपूर हे विवाहित असल्याने नर्गिस यांनी राज यांची तब्बल ९ वर्षे वाट पाहिली होती. परंतु राज पत्नी आणि मुलाला सोडू शकले नाही.
-
३ मे १९८१ रोजी नर्गिस यांचे निधन झाले. त्यांच्या अंत्ययात्रेत राज कपूर इतर लोकांप्रमाणे सहभागी झाले होते
जेव्हा राज कपूर नर्गिस यांच्या प्रेमात पडले
‘बरसात’ या चित्रपटाच्या चित्रीकरणदरम्यान नर्गिस आणि राज कपूर यांच्या नात्याला सुरुवात झाली
Web Title: Remembering nargis dutt rare photos