-
आंतरराष्ट्रीय योग दिवस अनेक स्तरांध्ये साजरा करण्यात आला आहे. यामध्ये बॉलिवूड कलाकारही मागे नाहीत. चला जाणून घेऊया जाणून घेऊया या बॉलिवूड कलाकारांबद्दल…
-
अभिनेत्री शिल्पा शेट्टी आज फिटनेसच्या बाबतीत अनेकांची आयडियल आहे. शिल्पा नियमितपणे योगा आणि व्यायाम करत असून तिच्या आयुष्यामध्ये योगाला विशेष महत्व असल्याचे वारंवार दिसून येते. अनेक वेळा तिने काही व्हिडीओजच्या माध्यमातून चाहत्यांना योगाचं प्रशिक्षणही दिलं आहे. त्यातच तिने आता चाहत्यांसाठी शिल्पा शेट्टी नावाचा खास योगा करण्याकरता अॅप लॉन्च केला आहे.
-
बॉलिवूडमधील फिटनेस फ्रीक या नावाने प्रसिद्ध असलेली बिपाशा बासू कायम तिच्या फिटनेसमुळे चर्चेत असते. बिपाशा नियमितपणे योगा करते. सोशल मीडियावरही ती तिच्या योगाचे तसेच एक्सरसाईजचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असते.
-
मलायका अरोरा नियमितपणे योगा करत असल्यामुळे ती आजही फिट आहे. अनेक वेळा मलायका सोशल मीडियावर तिच्या योगाचे आणि व्यायामाचे व्हिडीओ, फोटो शेअर करत असते.
-
उर्मिला मातोंडकरने आंतराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहे. तिने योगा करतानाचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे.
-
कधी काळी प्रचंड हेल्दी असणारी आलिया आता फिट आणि स्लिम असल्याचं पाहायला मिळतं. आलियानेदेखील इतर अभिनेत्रींप्रमाणे योगाला महत्व दिलं आहे. आलिया आठवड्यातून २ वेळा अष्टांग योगा करते.त्यासोबतच ती मेडिटेशनही करते.
-
अनुपम खेर यांनी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करतानाचा फोटो ट्विटर खात्यावर शेअर केला आहे.
International Day of Yoga 2019 : या कलाकारांनी साजरा केला योग दिवस
आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करणाऱ्या कलाकरांबद्दल जाणून घेऊया…
Web Title: International yoga day 2019 celebration by bollywood celebrity avb