-
महाराष्ट्राच्या लाडक्या आराध्य दैवताचे आगमन लवकरच प्रत्येकाच्या घरात आणि सार्वजनिक मंडळात होणार आहे. कोणाच्या घरी दीड दिवस तर कुणाच्या पाच, सात आणि दहा दिवसांसाठी विराजमान झालेल्या बाप्पाच्या खिद्मतीस तसूभरदेखील कमतरता भासू नये, याची पूर्वतयारी प्रत्येकांनीच केली असेल.
-
मराठी सेलिब्रिटीजच्या घरीदेखील गणेशोत्सवाची मोठी धामधूम पाहायला मिळणार आहे.
-
मात्र, हिंदी आणि मराठीचा छोटा व मोठा पडदा गाजवणा-या राकेश बापटच्या घरी विराजमान होणाऱ्या गणेशमूर्तीची बातच न्यारी आहे.
-
ही गणेशमूर्ती राकेशने स्वहस्ते तयार केली असून, त्यासाठी त्याने नदीच्या गाळाचा आणि नैसर्गिक रंगाचा वापर केला आहे.
-
आपल्या बाप्पाची प्रतिकृती बाजारातून विकत न घेता स्वतःच्या हाताने तयार करून, त्याची अगदी भक्तिभावाने बापट कुटुंबात प्राणप्रतिष्ठा करण्यात येते.
-
याबद्दल बोलताना राकेश सांगतो की, ''गणेशमूर्ती तयीर करण्याची परंपरा माझ्याघरी पूर्वीपासून आहे. मी गेले अनेक वर्ष गणपतीची मूर्ती तयार करतोय.''
-
''गणपती बनवताना कोणता आकार किवा कोणत्या थीमवर बनवायचा हे मी कधीच ठरवत नाही, मला फक्त बाप्पा साकारायचा असतो,'' असं तो सांगतो.
-
आजच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला राकेश पूर्णपणे समर्थन देतो
-
प्रत्येकाने इको फ्रेंडली गणेशाची स्थापना करावी असा संदेशदेखील तो देतो.
-
हिंदी प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम मिळाले असून, माझी मातृभाषा असलेल्या मराठीतही मला विशेष ओळख निर्माण करायची आहे, त्यासाठी मला मराठी प्रेक्षकांचे उदंड प्रेम मिळो, अशी प्रार्थना तो गणेशाकडे करतो.
देवा श्री गणेशा! मराठी अभिनेत्याने घरातच साकारली इको फ्रेंडली गणेशमूर्ती
Web Title: Ganesh chaturthi 2019 raqesh bapat made eco friendly ganesh idol at home ssv