'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या सिझनचा विजेता शिव ठाकरे ठरला आहे. अमरावती जिल्ह्यात लहानाचा मोठा झालेल्या शिवला नृत्यदिग्दर्शक व्हायचं होतं. हे स्वप्न पूर्ण करून त्याने रिअॅलिटी शोकडे मोर्चा वळवला. नृत्यदिग्दर्शक झाल्यानंतर शिव 'एमटीव्ही रोडीज'मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला. अमरावतीसारख्या जिल्ह्यातून आलेल्या शिवनं 'रोडीज'मध्ये स्थान पक्कं केल्यानं त्याचं खूप कौतुक झालं होतं. या रिअॅलिटी शोमुळे त्याला चांगली प्रसिद्धी मिळाली. शिवचं बालपण जरी अमरावतीत गेलं असलं तरी तो सध्या पुण्यात राहतो. शिव पुण्यात डान्सचे क्लासेस घेतो. -
'बिग बॉस मराठी २'मध्ये त्याची आणि वीणा जगतापची चांगली मैत्री जमली. या दोघांचं अफेअर असल्याच्या चर्चा सुरू झाल्या.
-
सोशल मीडियावर शिववर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
शिव ठाकरे: ‘रोडीज’ ते ‘बिग बॉस मराठी २’चा विजेता
जाणून घ्या, शिव ठाकरेबद्दल…
Web Title: Know about bigg boss marathi 2 winner shiv thakare ssv