scorecardresearch

पाऊस

‘लोकसत्ता’च्या या सदरामध्ये तुम्हाला पावसासंबंधित सर्व माहिती मिळेल. पाऊस (Rain)ही हवामानाशी संबंधित घटना आहे. वातावरणात असलेल्या ढगांमधील वाफेचे जेव्हा द्रवरूपात रूपांतर होते तेव्हा पृथ्वीवर पाण्याचे थेंब पडू लागलाल. हवा थंड झाल्याने किंवा आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने पाऊस पडतो. सोप्या भाषेत सांगायचे, तर जेव्हा ढगांमधून पाण्याचे थेंब कोसळतात त्याला पाऊस म्हणतात. पाऊस ही मानवी जीवनासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. कारण- जेव्हा पाऊस पडतो तेव्हा जलप्राप्ती होते.


पावसाच्या पाण्यामुळे नदी, नाले आणि ओढे ओसंडून वाहू लागतात. सर्व पृथ्वी हिरवीगार होते. भारत हा प्रामुख्याने कृषिप्रधान देश आहे. भारतीय अर्थव्यवस्था शेतीशी संबंधित असल्याने पिकांच्या उत्पादनासाठी भारतात पावसाचे विशेष महत्त्व आहे. देशात काही ठिकाणी एकदाच पावसाळा असतो; तर काही ठिकाणी वर्षातून दोनदा पाऊस पडतो. दक्षिणेतील समुद्रात तयार होणाऱ्या हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे भारतात नैर्ऋत्य मोसमी वारे वाहू लागतात. दक्षिणेकडून हे वारे हळूहळू संपूर्ण भारतात पसरतात. परिणामस्वरूप भारतात पाऊस पडतो; ज्याला मान्सून, असे म्हटले जाते. त्यामुळे भारताचा विचार करता, अन्य राज्यांच्या तुलनेत दक्षिण भारतात अधिक पाऊस पडतो. पावसासंबंधीचा अंदाज हवामान खाते वर्तवीत असते.


पाऊस कधी येऊ शकतो, किती प्रमाणात पाऊस होईल यासंबंधीची सर्व माहिती हवामान खाते वेळोवेळी सांगत असते. या माहितीवर आधारित सविस्तर बातम्या तुम्ही येथे वाचू शकता. तसेच पावसाळ्यात देशभरातील विविध राज्यांची आणि शहरांमध्ये काय स्थिती आहे हेदेखील तुम्ही येथे जाणून घेऊ शकता. पावसाळा आला की, आरोग्यासंबंधीची काय काळजी घ्यावी, घराबाहेर पडताना काय काळजी घ्यावी, वाहनांची काळजी कशी घ्यावी अशी अनेक विषयांवरील माहिती तुम्ही येथे जाणून घेऊ शकता. तसेच पावसाळ्यात भेट देण्यासारखी स्थळे कोणती आतहे, पावसाळ्यात पर्यटन करताना काय काळजी घ्यावी अशी माहितीदेखील तुम्ही येथे जाणून घेऊ शकता.


Read More
Paddy threshing Gondia district
गोंदिया : पावसाने उसंत घेतल्याने धान मळणीला गती; मात्र, अवकाळी पावसामुळे….

दोन – तीन दिवसांच्या अवकाळी पावसाने उसंत घेतल्याने पुन्हा एकदा जिल्ह्यातील शेतशिवारात मळणीच्या कामाला प्रारंभ झाला आहे.

Cyclone michaung photo gallery, Cyclone michaung, cyclone michaung updates, cyclone, andhra pradesh, tropical storms, Myanmar, latest news on Cyclone michaung, top news, business news,
10 Photos
चक्रीवादळ Michaung ने केला कहर! चेन्नईमध्ये पूरसदृश परिस्थिती, विमानांचे उड्डाणदेखील झाले रद्द, फोटो पाहा

Michaung (migjaum म्हणून उच्चारले जाते) हे म्यानमारने सुचवलेले नाव आहे, याचा अर्थ ताकद किंवा लवचिकता आहे.

Michaung Cyclone vidarbh yellow alert rain
आज विदर्भासह मराठवाड्याला विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा; या जिल्ह्यांना “यलो अलर्ट”

विदर्भातील गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ जिल्ह्यात विजांसह पावसाचा ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

heavy rains in Palghar district
पालघर : ‘अवकाळी’मुळे बळीराजाच्या मेहनतीवर पाणी

भाताची कापणी पूर्ण होऊन झोडणी, मळणीच्या स्थितीमध्ये पावसाने अचानक दमदार हजेरी लावल्याने शेतकरी तसेच बागायतदार, मच्छीमार व इतर व्यावसायिक हवालदिल…

Rain overnight talukas Sangli district
सांगली : अवकाळी पावसाची रात्रपाळी

अवकाळी पावसाने तासगाव, मिरज, कवठेमहांकाळ आणि पलूस या चार तालुक्यांत रात्रभर धिंगाणा घातल्याने द्राक्ष बागायतदारांच्या तोंडचे पाणी पळविले आहे.

today yellow alert in vidarbh, today yellow alert in marathwada, today yellow alert in konkan
बंगालच्या उपसागरात ३ डिसेंबरपर्यंत चक्रीवादळ; आज विदर्भासह उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणला ‘यलो अलर्ट’

विदर्भासह उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण येथे शुक्रवारी पावसाची शक्यता असून हवामान खात्याने “यलो अलर्ट” दिला आहे.

संबंधित बातम्या

क्विझ ×