-
मराठी चित्रपटसृष्टीचा ‘चॉकलेट बॉय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता सिद्धार्थ चांदेकरच्या आयुष्यात अभिनेत्री मिताली मयेकर ही जणू ‘गुलाबजाम’चा गोडवा आणणारी आहे.
-
मराठीतील 'क्यूट कपल' म्हणून या दोघांकडे पाहिलं जातं.
-
गेल्या वर्षी 'व्हॅलेंटाइन डे'ला पहिल्यांदा सिद्धार्थनं इन्स्टाग्राम पोस्टमधून आपल्या प्रेमाची कबुली दिली होती.
-
सिद्धार्थनं त्यावेळी मितालीसोबतचा फोटो शेअर करत तिला प्रपोज केलंय आणि तिनं होकारही दिला असं म्हणत आयुष्यातील सर्वात खास व्यक्तीची नव्यानं ओळख आपल्या चाहत्यांना करून दिली होती.
-
'माझ्या नवऱ्याची बायको'मधील शनाया अर्थात रसिका सुनील आणि सिद्धार्थ चांदेकरचे प्रेमप्रकरण इंडस्ट्रीत चर्चेचा विषय होता. पण काही कारणास्तव त्यांचे नाते टिकू शकले नाही.
-
सिद्धार्थ व मिताली सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे बरेच फोटो शेअर करताना दिसतात.
-
या वर्षाच्या सुरुवातीस सिद्धार्थ आणि मितालीचा साखरपुडा पार पडला.
-
मोजक्याच कुटुंबीयांच्या उपस्थितीत हा साखरपुडा पार पडला असून सिद्धार्थनं साखरपुड्याचे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले होते.
-
‘उर्फी’ चित्रपटातून मितालीनं चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं त्यानंतर 'झी युवा'वरच्या ‘फ्रेशर्स’ मालिकेतही मितालीनं काम केलं आहे.
'अग्निहोत्र' या स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकेतून सिद्धार्थने 2008 साली टीव्ही क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. त्यानंतर ‘अग्नीहोत्र’, 'कशाला उद्याची बात', 'प्रेम' हे यासारख्या मालिकांमध्ये तो झळकला. तर ‘गुलाबजाम’, ‘क्लासमेट’सारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्याने भूमिका साकारल्या.
मितालीच्या आयुष्यातील ‘जिवलगा’
मराठी चित्रपटसृष्टीचा ‘चॉकलेट बॉय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता सिद्धार्थ चांदेकरच्या आयुष्यात अभिनेत्री मिताली मयेकर ही जणू ‘गुलाबजाम’चा गोडवा आणणारी आहे.
Web Title: Siddharth chandekar and mitali mayekar romantic photos ssv