• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • बिहार निवडणूक
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • बिहार निवडणूक निकाल
  • लोकसत्ता प्रीमियम
  • लोकसत्ता सविस्तर
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. 10 bollywood stars and their special clauses before signing up any film scsg

चित्रपट करणार पण एका अटीवर… जाणून घ्या १० कलाकारांच्या १० अटी

चित्रपट करताना अनेक कलाकार निर्मात्यांसमोर आणि दिग्दर्शकांसमोर काही अटी

December 11, 2019 17:00 IST
Follow Us
  • बॉलिवूडमध्ये वर्षाला शेकडो चित्रपट प्रदर्शित होतात. हे चित्रपट बक्कळ कमाईही करतात. अर्थात त्यामुळेच अनेक चित्रपट कलाकार हे तरुणाईंच्या गळ्यातील ताईत आहेत. पण हे कलाकार कोणताही चित्रपट करताना निर्मात्यांसमोर आणि दिग्दर्शकांसमोर काही अटी ठेवतात. अनेकांना हे ठाऊक नसेल पण बडे कलाकार चित्रपट करताना काही खास अटी ठेवतात, जाणून घेऊयात असेच काही कलाकार आणि त्यांच्या अटींबद्दल...
    1/12

    बॉलिवूडमध्ये वर्षाला शेकडो चित्रपट प्रदर्शित होतात. हे चित्रपट बक्कळ कमाईही करतात. अर्थात त्यामुळेच अनेक चित्रपट कलाकार हे तरुणाईंच्या गळ्यातील ताईत आहेत. पण हे कलाकार कोणताही चित्रपट करताना निर्मात्यांसमोर आणि दिग्दर्शकांसमोर काही अटी ठेवतात. अनेकांना हे ठाऊक नसेल पण बडे कलाकार चित्रपट करताना काही खास अटी ठेवतात, जाणून घेऊयात असेच काही कलाकार आणि त्यांच्या अटींबद्दल…

  • 2/12

    करिना कपूर – २०१३ साली सैफ अली खानबरोबर लग्न झाल्यानंतर करिनाने चित्रपटांसंदर्भातील करार करताना एक अट सक्तीची केली आहे. मी कोणतेही किसींग सीन अथवा बेडरुमधील सीन करणार नाही अशी अट करिना चित्रपटाच्या करारावर स्वाक्षरी करताना घालते.

  • 3/12

    सलमान खान – सलमान कधीच आपल्या चित्रपटांमध्ये बोल्ड सीन दिलेले नाही. अशी दृष्ये पाहताना स्रीयांनाच नाही तर पुरुषांनाही अवघडल्यासारखे होते असं सलमान सांगतो. तसेच सलमान चित्रपटांमध्ये किसींग सीनही देत नाही. सलमानची आई त्याचे सर्व चित्रपट पाहते त्यामुळेच तो अशी दृष्ये देणे टाळतो.

  • 4/12

    अली जफर – पाकिस्तानी अभिनेता अली हा किसींग सीन देत नाही. तसेच तो खासगी क्षणांसंदर्भातील सीन म्हणजेच बेडरुम किंवा बोल्ड सीन दिलेले नाहीत. हे सीन पाहून माझ्या देशातील लोक माझ्याबद्दल काय विचार करतील हेच सतत माझ्या डोक्यात असतं म्हणून मी असे सीन करणं टाळतो असं अलीने सांगितलं होतं.

  • 5/12

    प्रियंका चोप्रा – प्रियंका आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्टार झाली आहे. मात्र हॉलीवूडमध्ये चित्रपटांचे करार करताना प्रियंका 'न्यूड सीन' देणार नाही असं स्पष्ट करते.

  • 6/12

    अक्षय कुमार – अनेक प्रकारच्या साहसदृष्यांसाठी लोकप्रिय असणारा अभिनेता म्हणजे अक्षय कुमार. चित्रपटाच्या करारावर स्वाक्षरी करताना मी रविवारी काम करणार नाही अशी अट अक्षय घालतो. असं असलं तरी त्याने 'वन्स अप ऑन अ टाइम इन इंडिया टू' आणि 'ब्रदर्स' चित्रपटांचे चित्रकरण पूर्ण करण्यासाठी रविवारी कामं केलं होतं.

  • 7/12

    ऋतिक रोशन – चित्रपटांच्या चित्रिकरणासाठी नियोजित दिवसांपेक्षा जास्त काळ लागल्यास अधिकच्या कामासाठी अधिक पैसे मोजावे लागतील अशी अट ऋतिक चित्रपट निर्मात्यांना घालतो. 'जर मी जास्त काम करतो तर मला जास्त पैसे मिळाले पाहिजेत.' अशी ऋतिकची भूमिका असते.

  • 8/12

    कंगना राणावत – कंगना राणावत चित्रपटांसाठी करारावर स्वाक्षरी करताना चित्रपटाचे शेवटचे दृष्य हे माझ्यावर चित्रित झालेले असावे अशी अट घालते. असं असेल तरच ती चित्रपटाला होकार देते.

  • 9/12

    तनुज विरवाणी – तनुजला सापांची आणि सरपटणाऱ्या प्राण्यांची प्रचंड भिती वाटते. त्यामुळेच तो चित्रपटांचा करार करताना सापांचे सीन करणार नाही असं तो आधीच सांगतो. नुकत्याच त्याच्या एका चित्रपटाचे चित्रिकरण थायलंडमधील जंगलांमध्ये झाले होते. याबद्दल त्याने नाराजी व्यक्त केली होती.

  • 10/12

    सनी लिओनी – बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीने सुरुवातील 'जिस्म टू' आणि 'वन नाईट स्टॅण्ड'सारखे बोल्ड चित्रपट केले. मात्र त्यानंतर सनीने मोठ्या पडद्यावर किसींग सीन देणार नाही असं स्पष्ट केलं आहे. चित्रपटाच्या करारावर स्वाक्षरी करताना सनी 'नो किसींग'ची अट घालते.

  • 11/12

    शाहरुख खान- बॉलिवूडचा किंग म्हणजेच शाहरुख खान. शाहरुखने आत्तापर्यंत शेकडो चित्रपटांमध्ये काम केलं आहे. पण शाहरुखला एका गोष्टीची खूप भिती वाटते. ती म्हणजे घोड्यांची.

  • 12/12

    अर्थात शाहरुखने 'करण-अर्जून', 'अशोका', 'बाजीगर'सारख्या चित्रपटामध्ये घोड्यांसोबतचे सीन केले आहेत. पण एकदा शाहरुख घोड्यावरुन पडला होता. तेव्हापासून तो घोडेस्वारीला खूप घाबरतो. त्या प्रसंगानंतर शाहरुख चित्रपटांचे करार करताना तो 'घोडेस्वारी करणार नाही' अशी अटच करारामध्ये ठेवतो.

Web Title: 10 bollywood stars and their special clauses before signing up any film scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.