
कमी कालावधीमध्ये तुफान लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे तुझ्यात जीव रंगला. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात स्वत:च स्थान निर्माण केलं आहे. यातीलच एक कलाकार म्हणजे सन्नी दा अर्थात अभिनेता राज हंचनाळे. उत्तम अभिनय आणि व्यक्तिमत्त्वामुळे राज अनेक तरुणींच्या गळ्यातलं ताईत झाला आहे. काही दिवसांपूर्वीच राज लग्नाच्या बेडीत अडकला आहे. राजने मनीषा ऊर्फ मॉली डेस्वाल हिच्यासोबत लग्नगाठ बांधली. राज आणि मॉली यांचं लव्ह मॅरेज असून जवळपास सहा वर्षांपासून ते एकमेकांना ओळखतात. राज मूळचा कोल्हापूरचा असून मॉली हारयाणाची आहे. त्यामुळे तरुणींच्या गळ्यातलं ताईत असलेल्या सन्नीदाचा जीव मात्र मॉलीमध्ये रंगल्याचं दिसून येतं. -
-
-
-
खऱ्या आयुष्यात ‘या’ व्यक्तीमध्ये रंगला सन्नीदाचा जीव
उत्तम अभिनय आणि व्यक्तिमत्त्वामुळे राज अनेक तरुणींच्या गळ्यातलं ताईत झाला आहे
Web Title: Tuzyat jiv rangala sunny da aka raj hanchanale got married with molly deswal ssj