• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेशोत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. age of bollywood divas at the time of their husband first marriage scsg

पतीच्या पहिल्या लग्नात ‘ती’ किती वर्षांची होती

या सेलिब्रिटीजच्या वयासंदर्भातील चर्चा सोशल मिडियावर रंगतात

December 23, 2019 17:32 IST
Follow Us
  • आज आपल्याला बॉलीवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री दिसतात ज्यांनी त्यांच्यापेक्षा वयाने बऱ्याच मोठ्या आणि घटस्फोटीत कलाकाराबरोबर संसार थाटला आहे. अनेकदा या अभिनेत्यांच्या वयाची चर्चा सोशल मिडियावर रंगताना दिसते. दोघांच्या वयामधील अंतरावरुन त्यांना ट्रोलही केलं जातं. अशा जोडप्यांना पाहून प्रेमाला वय नसतं म्हणतात ते खरं असल्यासारखं वाटतं. पण खरोखर अशा जोडप्यांमधील जोडीदाराने पहिल्यांदा लग्न केलं तेव्हा त्याच्या आताच्या जोडीदाराचे वय किती होतं याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? चला तर जाणून घेऊयात अशाच काही सेलिब्रिटीजबद्दल...
    1/21

    आज आपल्याला बॉलीवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री दिसतात ज्यांनी त्यांच्यापेक्षा वयाने बऱ्याच मोठ्या आणि घटस्फोटीत कलाकाराबरोबर संसार थाटला आहे. अनेकदा या अभिनेत्यांच्या वयाची चर्चा सोशल मिडियावर रंगताना दिसते. दोघांच्या वयामधील अंतरावरुन त्यांना ट्रोलही केलं जातं. अशा जोडप्यांना पाहून प्रेमाला वय नसतं म्हणतात ते खरं असल्यासारखं वाटतं. पण खरोखर अशा जोडप्यांमधील जोडीदाराने पहिल्यांदा लग्न केलं तेव्हा त्याच्या आताच्या जोडीदाराचे वय किती होतं याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? चला तर जाणून घेऊयात अशाच काही सेलिब्रिटीजबद्दल…

  • 2/21

    सैफ अली खान याचे पहिले लग्न १९९१ साली अमृता सिंग हिच्याशी झाले.

  • 3/21

    सैफच्या पहिल्या लग्नाच्या वेळी त्याची सध्याची पत्नी करिना कपूर ही अवघ्या ११ वर्षांची होती. ती सैफच्या लग्नालाही गेली होती. या दोघांच्या वयामध्ये १० वर्षांचे अंतर आहे.

  • 4/21

    नागुर्जुनने पहिली पत्नी लक्ष्मी डग्गुबतीसोबत १९८४ साली लग्न केले होते. पण सतत होणाऱ्या भांडणामुळे नागार्जुन आणि लक्ष्मीने १९९० साली विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता.

  • 5/21

    लक्ष्मी यांच्याशी घटस्फोट झाला त्यावेळी नागार्जुन अभिनेत्री अमालासोबत चित्रपटांमध्ये काम करत होता. याच कालावधीमध्ये ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांनी १९९२ मध्ये लग्न केले. नागुर्जुनचे पहिले लग्न झाले तेव्हा अमाला १४ वर्षांची होती.

  • 6/21

    किशोर कुमार यांचे पहिले लग्न झाले १९५० साली झाले. त्यानंतर किशोर यांनी दोन लग्न केली.

  • 7/21

    किशोर कुमार यांची तिसरी पत्नी योगिता बाली यांचा जन्म १९५२ चा आहे. म्हणजेच किशोर यांचा पहिला विवाह झाल्यानंतर दोन वर्षांनी योगिता यांचा जन्म झाला होता.

  • 8/21

    अभिनेता मिलिंद सोमण याचे पहिले लग्न २००६ मध्ये फ्रेंच अभिनेत्री मिलेन जम्पनोइबरोबर झालं होतं. अवघ्या तीन वर्षांमध्ये म्हणजेच २००९ साली या दोघांचा घटस्फोट झाला.

  • 9/21

    त्यानंतर २२ एप्रिल २०१८ ला मिलिंदने अंकिता कोनवारशी दुसरे लग्न केलं. या दोघांच्या वयामध्ये २५ वर्षांचा फरक आहे. म्हणजेच मिलिंदचे पहिले लग्न झाले तेव्हा अंकिता अवघ्या १५ वर्षांची होती.

  • 10/21

    संजय दत्त याचे पहिले लग्न १९८७ साली रिचा शर्मा हिच्याशी झालं होतं.

  • 11/21

    संजयच्या पहिल्या लग्नाच्यावेळी त्याची सध्याची पत्नी मान्यता ही अवघ्या आठ वर्षांची होती. संजयने एकूण तीन लग्न केली आहेती. १९९८ साली त्याने रेहा पिल्लाई हिच्याशी लग्न केलं होतं.

  • 12/21

    अभिनेता आमिर खान याने रिना दत्त हिच्याशी १९८६ साली लग्न केलं होतं.

  • 13/21

    आमिरच्या पहिल्या लग्नाच्यावेळी त्याची आताची पत्नी किरण राव हिचे वय अवघे १३ वर्ष इतकं होतं.

  • 14/21

    गायक किशोर कुमार यांचे खासगी आयुष्य खूपच उलाढालीचे राहिले. त्यांची एकूण चार लग्न झालं. किशोर यांचे पहिले लग्न १९५१ साली रुमा गुहा ठाकुर्ता यांच्याशी झाले.

  • 15/21

    किशोर कुमार यांची चौथी पत्नी लिना चंदावरकर यांचा जन्म १९५० चा आहे. म्हणजेच किशोर कुमार यांचा जन्म झाला तेव्हा लिना अवघ्या एक वर्षाच्या होत्या.

  • 16/21

    धर्मेंद्र आणि हेमा मालिनी ही जोडी आजही प्रेक्षकांना भूरळ घालते. मात्र धर्मेंद्र याचे पहिले लग्न १९५४ साली प्रकाश कौर हिच्याशी झालं होतं.

  • 17/21

    'तूम हसीन मै जवान' या चित्रपटाच्या शुटींगदरम्यान धर्मेंद्र हेमा यांच्या प्रेमात पडले. हेमा ही धर्मेंद्र यांच्या प्रेमात पडल्या. अखेर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र धर्मेंद्र यांची पहिली पत्नी त्यांना घटस्फोट द्यायला तयार नव्हती. अखेर हेमा आणि धर्मेंद्र यांनी इस्लाम धर्म स्वीकारला आणि लग्न केलं. हेमा यांचा जन्म १६ ऑक्टोबर १९४८ चा आहे. त्यामुळे धर्मेंद्र यांचं पहिलं लग्न झालं होतं तेव्हा हेमा या केवळ सात वर्षांच्या होत्या.

  • 18/21

    गीतकार जावेद अख्तर यांचे पहिले लग्न इराणी यांच्याशी १९७२ साली झाले होते.

  • 19/21

    जावेद यांची दुसरी पत्नी आणि लोकप्रिय अभिनेत्री शबाना आझमी यांचा जन्म १० सप्टेंबर १९५० रोजी झाला आहे. म्हणजेच जावेद यांचे पहिले लग्न झालं तेव्हा शबाना २२ वर्षांच्या होत्या.

  • 20/21

    बॉलीवूड अभिनेता कबीर बेदी यांचे पहिले लग्न १९६९ साली प्रतिमा यांच्याबरोबर झाले होते.

  • 21/21

    कबीर यांचे पहिले लग्न झाले त्यावेळी त्यांची सध्याची पत्नी म्हणजेच परवीन दुसांजचा जन्मही झाला नव्हता. परवीन दुसांजचा जन्म १९७५ सालचा आहे. म्हणजेच कबीर यांचे पहिले लग्न झाल्यानंतर सहा वर्षांची त्यांच्या सध्याच्या पत्नीचा जन्म झाला होता.

Web Title: Age of bollywood divas at the time of their husband first marriage scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.