लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची (Ganeshotsav) सुरुवात केली. त्याआधी गणेशोत्सव हा सण घरगुती स्वरुपामध्ये साजरा केला जात असे. पारतंत्र्यामध्ये लोकांनी एकत्र यावे यासाठी टिळकांनी ही प्रथा सुरु केली. मुंबई, पुणे, नागपूर या मोठ्या महानगरांसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव उत्साहामध्ये साजरा केला जातो. मुंबईमधील चाकरमनी खास गणपतीसाठी कोकण गाठतात. करोना काळामध्ये गणेशोत्सवावर काही प्रमाणामध्ये बंधने आल्याने गेल्या दोन वर्षांमध्ये गणेशोत्सव साजरा करण्याचे प्रमाण तुलनेने वाढले आहे.
ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यामध्ये गणेश चतुर्थीला गणेशोत्सवाची सुरुवात होते. तेव्हा लाडक्या बाप्पाची मूर्ती घरी आणली जाते. काही दिवसांचा पाहुणचार घेऊन बाप्पा अनंत चतुर्दशीच्या (Anant Chaturthi) दिवशी घरी जायला निघतात. गणेशोत्सवामध्ये एकूणच चैतन्याचा वातावरण असते. २०२३ मध्ये १९ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी येणार आहे.Read More
Pune’s Dagdusheth Ganpati Temple Overwhelmed with Devotees : दगडूशेठ गणपतीच्या जटोली शिवमंदीराचा देखावा पाहण्यासाठी शेवटचा रविवार असल्याने शिवाजी रोडवर नागरिकांनी…