बॉलिवूड कलाकार म्हटलं की ग्लॅमर आणि आकर्षक व्यक्तिमत्व आलंच. पण शाळा किंवा कॉलेजात असताना हे बॉलिवूड सेलिब्रेटीदेखील सर्वसामान्यांप्रमाणेच होते. आपण शाळेत असताना आणि आता जितका बदल झाला आहे तितकाच बदल या सेलिब्रेटींमध्येही झालेला दिसतो. पण आपल्यातील बदल आणि बॉलिवूड सेलिब्रेटींमधील बदल पाहिलात तर तुमचाही विश्वास बसणार नाही. -
रणबीर कपूर आज तरुणींच्या गळ्यातील ताईत आहे. आपल्या अभिनयाने रणबीर कपूरने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा रणबीर कपूर शाळेच्या दिवसात असा दिसायचा. मग काय फोटो पाहून धक्का बसला ना ?
दीपिका पादुकोन शाळेच्या दिवसांमध्ये अशी दिसायची. शाळकरी मुलीपासून ते एका प्रसिद्ध अभिनेत्रीपर्यंतचा खडतर प्रवास तिने यशस्वीपणे पूर्ण केला आहे. दीपिकाच्या लहानपणीच्या फोटोत असणारी स्माइल आजही तितकंच निरागस आहे. तुम्हाला काय वाटतं ? बॉलिवूडमध्ये सध्या ज्याचा गाजावाजा आहे तो अभिनेता म्हणजे रणवीर सिंग. रणवीर आता जितक्या उत्साहाने वावरत असतो तितकाच आधीपासून आहे. आपल्या अभिनयासोबत फॅशनध्येही रणवीर रिस्क घेत असतो. त्याचा हा फोटो पाहून याची सवय त्याला आधीपासूनच असल्याचं दिसतं. तुम्हाला कसा वाटला हा त्याचा लूक ? बॉलिवूडमध्ये कोणताही गॉडफादर नसताना कार्तिक आर्यन याने आपलं स्थान निर्माण केलं आहे. फक्त आपल्या अभिनयामुळे नाही तर लूकमुळेही कार्तिक आर्यनचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. आपल्या कॉलेजच्या दिवसांतही कार्तिक आर्यन तितकाच हॅण्डसम दिसत होता..तुम्हाला काय वाटतं ? सुशांत सिंह राजपूत मुळचा बिहारचा असून दिल्लीमधून इंजिनिअरिंग पूर्ण केलं आहे. त्याचा हा फोटो शाळेतून बाहेर पडल्यानतंरचा आहे. सुशांतने टीव्हीमधून आपल्या करिअरला सुरुवात केली. यानंतर त्याने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला आणि आज एक यशस्वी अभिनेता आहे. सुशांत सिंह कॉलेजमध्ये टॉपर होता. अभिनयासाठी त्याने अर्ध्यात शिक्षण सोडलं. -
सुशांत सिंह
जेनेलिया आज अभिनय क्षेत्रात नसली तरी अद्यापही तिचा चाहतवर्ग आहे. जेनेलियाने रितेश देशमुखसोबत लग्न केलं असून आपला संसार सांभाळत आहे. अभिनयात अनेक पुरस्कार मिळवणारी जेनेलिया शाळेत असतानाही तितकीच हुशार होती असंच फोटोत दिसतंय. तुम्हाला आवडला की नाही फोटो ? या फोटोत कोणता अभिनेता आहे हे तुम्ही ओळखू शकता का ? या फोटोत बॉलिवूड शेहनशहा अमिताभ बच्चन आहेत. शाळेत असतानाही अमिताभ बच्चन खूपच शिस्तबद्ध होते असं दिसतंय. लहान असल्यापासूनच या अभिनेत्रीला पुरस्कारांची सवय असल्याचं दिसत आहे. अभिनय क्षेत्रात येण्याआधी ऐश्वर्याला डॉक्टर होण्याची इच्छा होती. दहावीच्या परिक्षेत ऐश्वर्याला ९० टक्के गुण मिळाले होते. अनुष्का शर्माला लहानपणासूनच फोटोची आवड असावी. आपला वाढदिवस साजरा करताना अनुष्काचं सगळं लक्ष कॅमेऱ्याकडे आहे. अनुष्का शर्मा बंगळुरुत आर्मी स्कूलमध्ये होती. ही मुलगी कोणतीही अभिनेत्री नाही पण चर्चेत असते. बॉलिवूड सुपरस्टारसोबत तिचं लग्न झाले आहे. २०१५ मध्ये हे लग्न झालं असून तिच्यात आणि नवऱ्यात १३ वर्षांचं अतंर आहे. ओळखलंत का ? तर ही आहे अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत. प्रियंका चोप्राची बहिण म्हणून बॉलिवूडमध्ये प्रवेश केलेल्या परिणीतीने आज स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. हुशार विद्यार्थिनी असणारी परिणीती आज एक हुशार अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. -
प्रियंका चोप्राच्या आई-वडिलांना कामामुळे अनेक शहरांमध्ये वास्तव्य करावं लागलं. यामुळेच प्रियंकाला नेहमी शाळा बदलावी लागत असे. देसी गर्ल एक दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर इतकी मोठी स्टार होईल असा विचार कोणी केला होता..हे फोटो पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल ना ?
-
आलिया भट आता जितकी गोड दिसते तितकीच लहानपणीही होती…तुम्हाला काय वाटतं ?
बॉलिवूड सेलिब्रेटींचे शाळा, कॉलेजमधील ‘हे’ फोटो पाहून तुम्हीही चकीत व्हाल
बॉलिवूड कलाकार म्हटलं की ग्लॅमर आणि आकर्षक व्यक्तिमत्व आलंच
Web Title: Bollywood celebrity photos of schools and colleges sgy