-
या जगभरातील काही प्रसिद्ध ट्रान्सजेंडर अभिनेत्री आणि मॉडेल्स आहेत. ज्यांनी लिंगबदल शस्त्रक्रिया करुन स्त्री लिंग स्विकारले.
-
एप्रिल अॅश्ली – लिंगबदल शस्त्रक्रिया करुन महिला होणारी जगातील पहिली व्यक्ती. ६०च्या दशकातील प्रसिद्ध मॉडेल. पुरुष असताना जॉर्ज जेमीसन असं नाव होतं.
-
गौरीने पुरुष मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात केली होती. त्यावेळी तिचे नाव गौरव असे होते. बिग बॉस या रिअलिटी शोच्या ११ व्या पर्वात गौरव झळकला होता. त्यानंतर त्याने शस्त्रक्रिया करुन स्त्री लिंग स्विकारले.
-
किम पेट्रास – २७ वर्षीय किम पेट्रास जर्मनीमधील प्रसिद्ध पॉप सिंगर आहे. २०११ साली प्रदर्शित झालेल्या ‘वन्स पिस ऑफ टेप’ या म्यूझिक अल्बममुळे किम पहिल्यांदा प्रकाशझोतात आली.
-
जेना टालाकोव्हा – कॅनडामधील प्रसिद्ध मॉडेल. ‘ब्रेव्ह न्यू गर्ल्स’ या टीव्ही शोमुळे ती पहिल्यांदा प्रकाशझोतात आली होती.
-
थालिता झाम्पीरोली – ब्राझिलमधील प्रसिद्ध मॉडेल. वयाच्या २५ व्या वर्षी शस्त्रक्रिया केली.
-
अलेक्झांड्रा बिलिंग्ज – हॉलिवूडमधील प्रसिद्ध ट्रान्सजेंडर अभिनेत्री आहे. तसेच शिक्षक व समाजसेविका म्हणूनही प्रसिद्ध आहे.
-
आंद्रे पेज – २८ वर्षीय आंद्रे पेज ब्रिटनमधील प्रसिद्ध मॉडेल आहे.
-
रॉबर्टा क्लोज – ५५ वर्षीय रॉबर्टा ८०च्या दशकातील अमेरिकेतील प्रसिद्ध मॉडेल होती. प्ले बॉय मॅगझिनच्या कव्हर पेजवर झळकणारी ती पहिली ट्रान्सजेंडर आहे. तसेच ‘सिक्रेट अडमायर’, ‘टू ऑप काईंड’, ‘द ब्लूब’ यांसारख्या अनेक हॉलिवूडपटांमध्ये तिने काम केले आहे.
-
किली वेन डर वीर – अमेरिकेतील प्रसिद्ध ट्रान्सजेंडर मॉडेल आहे. आपल्या मादक अदांसाठी प्रसिद्ध असलेली किली ‘द बिग ब्रदर’ या रिअलिटी शोमुळे पहिल्यांदा प्रकाशझोतात आली.
-
ली टी – अमेरिकेतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या ट्रान्सजेंडर मॉडेल्सपैकी एक म्हणून ओळखली जाते. २०१२ साली प्रदर्शित झालेल्या ‘द अमेझिंग स्पायडरमॅन’ या चित्रपटात देखील ली टी झळकली होती.
-
नॉग पॉय – थाईलंडमधील प्रसिद्ध अभिनेत्री. ३३ वर्षीय नॉगने वयाच्या २० व्या वर्षी शस्त्रक्रिया करुन स्त्री लिंग स्विकारले.
-
शिनाता सांघा – भारतीय वंशाची शिनाता ब्रिटनमधील प्रसिद्ध ट्रान्सजेंडर मॉडेल आहे. तिने २००६ साली प्रदर्शित झालेल्या ‘द चेसर’ आणि २००९ साली प्रदर्शित झालेल्या ‘द हाऊसमेड’ या कोरिअन चित्रपटांमध्ये अभिनेत्री म्हणून काम केले आहे.
-
सिरापासॉर्न अठ्ठायकॉन – थाईलंडमधील प्रसिद्ध मॉडेल. मुलगा म्हणून जन्माला आलेल्या सिरापासॉर्नने वयाच्या १८ व्या वर्षी शस्त्रक्रिया करुन स्त्री लिंग स्विकारले. आश्चर्याची बाब म्हणजे २००४ साली तिने ‘मीस इंटरनॅशनल क्वीन’ ही सौंदर्य स्पर्धा जिंकली होती.
-
भारतीय वंशाची मल्लिका अमेरिकेतील प्रसिद्ध ट्रान्सजेंडर मॉडेल आहे. २००७ साली अमेरिकेतील एक सौंदर्य स्पर्धा जिंकल्यामुळे ती पहिल्यांदा प्रकाशझोतात आली होती.
जन्माने पुरुष असलेल्या अभिनेत्री
Web Title: Hot and gorgeous actress who were born as male mppg