-
राजा रवी वर्मा यांना भारतातले पहिले आधुनिक चित्रकार म्हटल्यास वावगं ठरणार नाही. भारतीय इतिहासात चित्रकलेला ज्यांनी एका उंचीवर नेऊन ठेवलं त्या राजा रवी वर्मा यांच्या पेंटिंग्ज आता फोटोग्राफीच्या माध्यमातून रिक्रिएट करण्यात आल्या. प्रसिद्ध फोटोग्राफर जी. व्यंकट राम यांनी त्यांच्या कॅलेंडरसाठी ही संकल्पना अंमलात आणली. दाक्षिणात्य अभिनेत्री आणि कला क्षेत्रातील नावाजलेल्या व्यक्तींना घेऊन जी. व्यंकट राम यांनी राजा रवी वर्मा यांचे पेंटिंग्स फोटोग्राफीद्वारे हुबेहूब रिक्रिएट केले आहेत.
दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन यांची सून समंथा अक्किनेनी -
अभिनेत्री श्रुती हासन..
पेंटिंगमधली प्रत्येक गोष्ट अत्यंत बारकाईने फोटोग्राफीत टिपली गेली आहे. तामिळ अभिनेत्री ऐश्वर्या राजेश 'बाहुबली' चित्रपटात राजमाता शिवगामीची भूमिका साकारलेली अभिनेत्री रम्या कृष्णन अभिनेत्री आणि निर्माती लक्ष्मी मंचू जवळपास २०० हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेली अभिनेत्री खुशबू सुंदर तामिळ, तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांमधील अभिनेत्री लिजी लक्ष्मी अभिनेत्री नाडिया
फोटोग्राफीने हुबेहूब रिक्रिएट केले प्रसिद्ध चित्रकाराचे पेंटिंग
नागार्जून यांची सून, श्रुती हासन, ‘बाहुबली’ फेम रम्या कृष्णन हे या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहेत.
Web Title: Samantha akkineni ramya krishnan shruti haasan and others recreate raja ravi varma paintings ssv